चंद्रमुखी फेम अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणजेच अख्या महाराष्ट्राला वेड लावणारी चंद्रा. अमृता सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असते. तसेच तिने शेअर केलेल्या फोटोज् आणि व्हिडिओज मुळे ती बरीच चर्चेत असते.
अमृता सध्या ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये ही झळकत आहे. त्याशिवाय बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका साकारलेला ‘हर हर महादेव’ हा तिचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे.
या दरम्यान अमृताने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्या क्रिकेट सामन्यादरम्यानचा एक किस्सा तिने सांगितला. पण हा किस्सा तिच्याबद्दल नसून तिच्या नवऱ्याबद्दल म्हणजेच हिमांशू मल्होत्राचा आहे. अमृताने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत नवऱ्याचा हा धम्माल किस्सा सांगितला आहे. हा सामना पाहत असताना हिमांशूची फारच वाईट अवस्था झाल्याची सांगत तिने तो किस्सा सांगितला.
View this post on Instagram
अमृता म्हणाली की, “हिमांशू रणजी क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याला क्रिकेटचं भारी वेड आहे. महेंद्रसिंह धोनीला तो देव मानतो. अर्थात भारताचा प्रत्येक सामना स्टेडियमला जाऊन पाहणं आम्हाला शक्य नसल्याने जेव्हा शक्य असेल तेव्हा आम्ही टीव्हीवर मॅच नक्कीच पाहतो. त्यादिवशीही आम्ही भारत-पाकिस्तान सामना पाहत होतो.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “हिमांशूचं क्रिकेटचं वेड आणि त्यातही भारत- पाकिस्तान सामना असल्याने त्याची स्वतःची वेगळीच कॉमेंट्री सुरू होतीच. याने असं खेळायला हवं त्याने तसं असं बरंच काही चाललं होतं. पण शेवटचे काही चेंडू उरलेले असताना त्याचा अक्षरशः श्वास अडकला होता. तिकडे विराट खेळत होता आणि अखेर भारताना सामना जिंकला तेव्हा हिंमाशू चक्क रडायला लागला होता. त्याला भावना अनावर झाल्या होत्या. रडू आवरत नव्हतं तो खूपच भावूक झाला होता.”