‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. या मालिकेतील अंकिताची अर्चना ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या तितकीच लक्षात आहे. या मालिकेमुळे अंकिता प्रसिद्धीच्या झोतात आली.
त्यानंतर तिने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करून, प्रेक्षकांचे मन जिंकून भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला. अंकिताने विकी जैन सोबत लग्नगाठ बांधल्यानंतर आणि आजही तिची चर्चा कायम आहे. आता सध्या हिंदी बिग बॉसच्या १७ व्या सिझनमुळे अंकिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कालच हिंदी बिग बॉस सिझन १७ चा प्रीमियर पार पडला.
Saree but not sorry for making a fabulous entry in Bigg Boss 17💜@BeingSalmanKhan @JioCinema @EndemolShineIND @justvoot @VootSelect @BiggBoss #AnkitaLokhandeJain #VickyJain #AnViInBiggBoss17 #BiggBoss17Journey #BiggBoss17 #BB17 #DilDimaagAurDum #Voot #VootSelect #Colors… pic.twitter.com/WSDL1hM3C1
— Ankita lokhande Jain (@anky1912) October 16, 2023
‘कपल विरुद्ध सिंगल’ ही यंदाच्या सिझनची थीम असल्यामुळे यावेळी काही कपल्स देखील स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यात अंकिता तिच्या पती सह म्हणजेच विकी जैनसोबत या शो मध्ये सहभागी झाली आहे. घरात पाऊल टाकताच आता अंकिताच्या चर्चांना उधाण आले आहे. एन्ट्री करताना सलमानसोबत बातचीत करताना या शोमध्ये अंकिता तब्बल २०० कपडे घेऊन आली आहे असं समोर आलं आहे. याबद्दल सलमानने विचारले असता अंकिता म्हणाली,”बिग बॉस’मधील प्रत्येक प्रसंग आणि खेळ लक्षात घेऊन मी कपडे आणले आहेत”.
Salman Khan and our golden couple #AnVi's on-stage banter really made us smile hard, and we hope it does the same for you since this is just the beginning 👁️😉@BeingSalmanKhan @ColorsTV @JioCinema @EndemolShineIND @justvoot @VootSelect #AnkitaLokhandeJain #VickyJain… pic.twitter.com/hUC1WfFYTn
— Ankita lokhande Jain (@anky1912) October 16, 2023
घरात प्रवेश करण्याआधीच अंकिताच्या कपड्यांची चर्चा सुरु झाली आहेत. बिग बॉसच्या घरात लागणारे कपडे पॅक करतानाचा व्हिडीओ अंकिताने शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अफलातून कमेंट्स दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरातील राडा सुरु व्हायच्या आधीच अंकिताची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तर इथून येणाऱ्या पुढील काळात ती बिग बॉस नक्कीच गाजवेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.