वयाच्या २५ व्या वर्षी अॅस्ट्रो मेंबर मूनबिनचे निधन झाले आहे. मूनबिन १९ एप्रिल रोजी रात्री ८:१० च्या सुमारास त्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आला. दक्षिण कोरियाच्या अनेक आउटलेट्सने मूनबिनच्या निधनाची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना वाटतं की त्याने आत्महत्या केली असावी. त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्याचे शवविच्छेदन केले जाईल. पण त्याची एजन्सी फॅन्टेजिओने त्याच्या मृत्यूबद्दल अजून कोणती माहिती दिलेली नाही.
कोरियाबूच्या सांगण्यानुसार मूनबिन के-पॉप आयडल सियोलमधील गंगनम-गु येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला. मूनबिनने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
[KSD HEAD ADMIN]
We heard a sad news. We lost an angel.
We are sending our deepest condolences to his family, friends and Aroha.
May you rest in peace, Moonbin.
As an Aroha– since pre debut, it’s painful to write something like this.
You will always be remembered. 😭 pic.twitter.com/OktKkLiuok
— KIM SUNOO DAILY 🦊 (@kimsunoodaily) April 19, 2023
मूनबिन लवकरच एक फॅन कॉन टूर होस्ट करणार होता. त्याने त्याच्या अॅस्ट्रो यूनिट ग्रूपसोबत पुनरागमन केले असून २०२३ रोजी मूनबिन आणि सान्हा फॅन कॉन टूर: जकार्ता येथे १३ मे रोजी होणारा इव्हेंट आत्ता रद्द करण्यात आला आहे.
मूनबिनच्या मृत्यूच कारण अजूनही समोर आलेल नाही. पण त्याच्या अचानक निधनाने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याचे चाहते सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत त्याला श्रद्धांजली देत आहेत.