भारतीय सिनेसृष्टीत सध्या अनेक कलाकार त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी देत आहेत. काही कलाकार नवीन घराची, काही कलाकार त्यांच्या लग्नाची तर काही कलाकार आई-वडील होणार असल्याची गोड बातमी देत आहे. तर आता आणखी एक सुंदर जोडी त्यांच्या चाहत्यांना गोड बातमी देणार असल्याची चर्चा रंगली आहे, ती लोकप्रिय जोडी म्हणजे बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh).
कायम एक नवखा अंदाज घेऊन प्रेक्षकांच्या समोर येणारी दीपिका आणि रणवीरची ही जोडी चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाला आता पाच वर्षांहून अधिक काळ झाला आहे. परंतू अद्याप त्यांनी गोड बातमी दिली नव्हती. पण आता मात्र दीपिकाच्या एका वक्तव्याने दीपिका लवकरच आई आणि रणवीर बाबा होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत. त्यामुळे आता हे पावर कपल एका भलत्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत.
View this post on Instagram
दीपिका आणि रणवीर यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाच्या अनेक फोटोंनी त्यावेळी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तसेच त्यानंतर वेगवेगळ्या कारणामुळे या दोघांच्या चर्चा सातत्याने सुरूच असतात. पाच वर्षांहून जास्त काळ झाल्यामुळे सारेजण त्यांच्या आनंदाच्या बातमीची वाट पाहत आहेत. त्यातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने या विषयावर भाष्य केलं. तसेच ती लवकरच आई होणार आहे? याची हिंट तिने दिली आहे का? अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत.
हे देखील वाचा : गंभीर आजारातून बाहेर पडल्यावर ‘श्रेयस’ म्हणाला, “तुम्ही जिवंतच नसाल तर…”
लहान पाहुण्याच्या आगमनाबद्दल बोलताना दीपिका म्हणली की, “रणवीर आणि मला लहान मुले खूप आवडतात. आमच्या कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री कधी होणार याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.” तसेच लग्नानंतर नव्या घरात गेल्यावर झालेल्या बदलाबद्दल बोलताना ती म्हणाली की, “कुटुंबातील मंडळी मला भेटल्यानंतर माझ्यात काहीही बदल झाला नाही.”
तसेच मुलाखती दरम्यान दीपिका अगदी त्यांच्या मुलांवर करण्यात येणाऱ्या संस्कारांवर देखील स्पष्टपणे बोलली. तेव्हा ती म्हणाली की, “इंडस्ट्रीत पैसे आणि फेम मिळवलं असलं तरी आजही माझे पाय जमिनीवरच आहेत. घरी मी सेलिब्रिटी नसते. माझे पाय जमिनीवर ठेवण्यात माझ्या कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. रणवीर आणि मी आमच्या मुलांवरदेखील असेच संस्कार करू.”
यामुळे रणवीर आणि दीपिका लवकरच गुड न्यूज देणार आहेत का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.