सिनेसृष्टीतील असा अभिनेता ज्याच्यासाठी आपल्या मनाचे दरवाजे कायम उघडे आहेत….राहणार आणि त्याच्यावर प्रेम होतं आणि….कायम राहणार…. असा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे सुशांत सिंग राजपूत.
निर्मात्या एकता कपूर यांच्या २००८ मधील किस देश में है मेरा दिल या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि अभिनय क्षेत्रात त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनतर मालिका क्षेत्रातील पवित्र रिश्ता या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतून तो घराघरांत पोहोचला.
सुशांतने ‘काई पो छे’ या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने अल्पावधीतच किस देश मैं है मेरा दिल, पवित्र रिश्ता या मालिकांमधून तर शुध्द देसी रोमान्स, एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी, राबता, केदारनाथ, छिछोरे आणि त्याचा शेवटचा दिल बेचारा या चित्रपटांतून चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. यासाठी त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर पवित्र रिश्ता मधील सह-कलाकार अंकिता लोखंडे सोबत ‘झलक दिखला जा’ या डान्स रिऍलिटी शोमध्ये भाग घेतला होता. आणि या शो दरम्यानच सुशांतने अंकिताला प्रपोज केले अन् त्यांच्या डेटिंगला सुरुवात झाली. काही वर्षांच्या डेटिंग नंतर २०१६ मध्ये सुशांतने लग्नाची घोषणा केली पण त्यापूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले.
त्यांनतर सुशांतचं नाव क्रिती सेनॉन सोबत जोडलं जात होत पण सुशांतने याबाबतीत मौनचं बाळगले होते. तर २०१९ मध्ये सुशांत आणि रिया चक्रवर्ती हे एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलं, ते दोघे अनेकदा एकत्र दिसले. पण त्या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल बोलणे टाळले. पण सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने केवळ त्याची मैत्रीण असल्याचे माध्यमांना सांगितले.
अभिनयाव्यतिरिक्त त्याला वाचनासह खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातही प्रचंड आवड होती, तसेच तो एका NGO चा संस्थापक तर टेक्नॉलॉजीकल स्टार्टअपचा सह-संस्थापक होता.
तो कधीच पैशांच्या मागे धावला नाही, तर त्याने कायम गरजूंना मदतच केली. त्याला विज्ञानाची इतकी आवड होती की तो स्वखर्चाने लहान मुलांना नासामध्ये पाठवत असे. तसेच सुशांत देशातील असा पहिला अभिनेता होता ज्याने चंद्रावर जमीन विकत घेतली होती.
अशा आपल्या लाडक्या सुशांत सिंग राजपूतची १४ जून २०२० रोजी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी प्राणज्योत मालवली.
सगळ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या कलाकाराच्या कलाकृतीतून तो कायम जिवंत राहूदेत हीच सदिच्छा…