सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘आदिपुरुष’ या सिनेमाची. सिनेमात रामाची भूमिका प्रभास तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनॉन दिसून येणार आहे, तर हनुमानाच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे दिसणार आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. हा सिनेमा १६ जून पासून चित्रपटगृहात येणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यामधील काही सीनवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतले, त्यामुळे हा सिनेमा तब्बल ८ महिने उशिरा प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचं प्रमोशन देखील अगदी दणक्यात सुरु आहे. आता हा चित्रपट एक नवीन विक्रम करतोय की काय याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाल आहे.
तब्बल ४०० कोटींच बजेट असलेला सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे. यापूर्वी अभिनेता रणबीर कपूरने गरीब मुलांसाठी १० हजार तिकिटांची खरेदी करून ठेवली आहे. तसेच काश्मीर फाईल्सचे निर्माते यांनी देखील १० हजार तिकिटे खरेदी केली आहेत. तसेच इतर तिकिटांची खरेदी बघता गुरुवारपर्यंत ३.५० ते ४ लाखाच्या घरात तिकिटांची विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिकिटांची विक्री बघता या सिनेमाने २ कोटींच्या घरात कमाई केली आहे.
प्रेक्षक देखील सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहेत. ॲडव्हान्स बुकिंग मध्ये २ कोटी कमवले असून आता हा सिनेमा किती कमाई करेल हे येत्या काळात समजेल.