‘रामायण’ मालिकेमधून आपल्या समोर आलेली जोडी डेबिना आणि गुरमीत यांनी पुन्हा एकदा गोड बातमी दिली आहे. या जोडप्याला दुसरी मुलगी झाली आहे. गुरमीत डेबिनाच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर या जोडीने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. एप्रिल २०२२ मध्ये त्यांची पहिली मुलगी लीयानाचा जन्म झाला. त्यानंतर ११ नोव्हेंबरला त्यांनी सोशल मीडिया द्वारे आपल्याला मुलगी झाल्याचे सांगितले.
‘डेबिनाला ९ महिने पूर्ण होण्याआधीच डिलिव्हरी झाली. आई आणि बाळ दोन्हीही सुखरूप आहेत. वेळेआधी जन्मलेल्या आमच्या बाळाला तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि प्रेम कायम असुद्या’ असे गुरमीतने सोशल मीडियावर सांगितले. गुरमीत आणि डेबिना वर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हे सेलेब्रिटी कपल पहिल्यांदा २००६ मध्ये एका टॅलेंट हंटला भेटले होते. तिथे झालेल्या मैत्रीनंतर ते दोघे २००८ मध्ये रामायण या मालिकेसाठी एकत्र आले. सेटवर त्यांचा सहवास वाढला. २००९ मध्ये त्यांनी घरच्यांच्या अपरोक्ष एका मंदिरामध्ये आपली लग्नगाठ बांधली. त्यावेळेस ते दोघे पती पत्नी और वो या मालिकेचा भाग होते. त्यानंतर त्यांनी २०११ मध्ये सर्वांसमवेत धुमधडाक्यात लग्न केले. आणि आता ते २ मुलींचे आई वडील सुद्धा आहेत.