आधी लिपलॉक आता कडाक्याचं भांडण, ‘अंकिता आणि विकी’चं नक्की चाललंय तरी काय?
भारतात सध्या हिंदी बिग बॉस चांगलाच लोकप्रिय आहे. याचा सिझन कोणताही असो, कलाकारही वेगवेगळे असुदेत पण प्रेक्षकांना आनंद आणि मनोरंजन भरभरून मिळतेच.
काही दिवसांपूर्वी हिंदी बिग बॉसचा १७ वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. अवघ्या काहीच दिवसांत या पर्वाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा स्वतःकडे खेचून घेतले आहे. या शोमुळे अनेक कलाकार प्रचंड चर्चेत येत असतात. तर सध्या १७ व्या सिझनच्या सुरुवातीपासूनच प्रचंड चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे ‘अंकिता लोखंडे.’
यावेळी कपलची थीम असल्यामुळे अंकिता विकीसोबत बिग बॉसच्या घरात गेली आहे. अंकिताने बिग बॉसच्या घरात पाऊल टाकल्यापासून तिची बाहेर प्रचंड चर्चा सुरु झाली. सुरुवातीलाच २०० कपड्यांवरून ती चर्चेत आली होती. परंतू आता तिने विकीसोबत केलेल्या एका कृत्यामुळे ती चर्चेत आली आहे. नुकताच पहिल्या आठवड्याचा विकेंड वार पार पडला.
View this post on Instagram
यावेळी खास नवरात्रीनिमित्त कंगना राणौत आली होती. तेव्हा तिने सलमान खान आणि घरातील सदस्यांसोबत मजा-मस्ती केली. यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, ज्यात अंकिता आणि विकी सर्वांसमोर डान्स करत असताना, एकमेकांना लिपलॉक करताना दिसले. डान्स करताना ते दोघेही भान हरपून बसले होते. ही चर्चा संपते ना संपते त्यात त्या दोघांची आणखी एक चर्चा सुरु झाली. पण आता ते दोघे रोमँटिक झाले नाही तर चक्क भांडले.
View this post on Instagram
गार्डन एरियामध्ये बसून बोलतात तेव्हा अंकिता विकीला म्हणते की, “मला वाटलेलं तू माझी ताकद आहे, पण तू नाहीस.” त्यावर विकी म्हणाला की, “मी दिवसभर तुझ्या मागे फिरू का? आणि मी हे नाही करू शकत.” त्यावर अंकिता ढसाढसा रडू लागली. त्यामुळे आता त्यांच्यातील भांडण कधी मिटणार की त्यांचा वाद आणखी किती चिघळणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.