बॉलिवूड कलाकार, त्यांचे सिनेमे आणि खास करून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जे काही घडतं त्यावर चाहत्यांचे बरेच लक्ष असते. आलिया, दीपिका, बिपाशा, करीना, प्रियांका, शाहरुख, सलमान, अक्षय यांसारखे सर्वच कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरून आपल्या आयुष्यातील आनंदाच्या, दुखःच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या या पोस्टला प्रतिसाद देत सोशल मीडियावर कलाकारांच्या पोस्टवर बरेच चाहते कमेंट्स करत असतात.
सध्या भारतीय सिनेसृष्टीत लगीनसराई सुरु आहे. काही दिवसांपूर्वी रकुल प्रीत आणि जैकी यांच्या लग्नाचा माहोल होता. त्या आधी आर्टिकल ३७० च्या प्रोमोशनच्या वेळेस यामी गौतमने एक खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली ती म्हणजे ती प्रेग्नंट असल्याची. तिच्या या गुड न्युजवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या. आता पुन्हा एकदा एका लोकप्रिय बॉलिवूड जोडी अशीच गोड बातमी घेऊन आली आहे. खरंतर या जोडीच्या अशा गोड बातमीच्या अनेक अफवा याआधी सुद्धा पसरल्या होत्या.
वेळोवेळी चाहत्यांनी याला दुजोरा देण्याचा प्रयत्न केला होता. पण आलेली बातमी खोटी आहे असं या जोडीकडून सांगण्यात आलं होतं. पण आता पुन्हा एकदा ही जोडी त्यांच्या याच वैयक्तिक करणामुळे चर्चेत आली आहे. आणि ती जोडी म्हणजे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल दीपिका आणि रणवीर. त्यांनी केलेल्या एका पोस्टमुळे सर्वत्र त्यांची चर्चा होत आहे.
एका प्रेस कॉन्फरन्समध्ये “आता कुटुंब वाढवण्याचा विचार करत आहोत.” असं दीपिका म्हणाली. त्यानंतर सर्वत्र चर्चा सुरु झाली ती तिच्या प्रेग्नंसीची. याबद्दल तिने याआधी काही भाष्य केलं नसलं तरी याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत दीपिका प्रेग्नंट आहे असे भाकीत केले. लग्नानंतर अवघ्या ६ महिन्यांत दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या बातम्या रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये पार पडलेल्या बाफ्टा अवाॅ र्ड्स २०२४ मध्ये दीपिकाने हजेरी लावली होती. यावेळी ती तिचा बेबी बंप लपवताना दिसली. त्यावेळी सुद्धा दीपिका प्रेग्नंट आहे का? अशा चर्चांना उधाण आले होते.
पण आज सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दीपिकाने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट करत थेट चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाचा महिनाच घोषित केला. येत्या सप्टेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीरच्या घरी पाळणा हालणार आहे. म्हणजेच आता दीपिकाचा दुसरा महिना सुरु असून वयाच्या ३८ व्या वर्षी दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.