बॉलिवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. ते कधी चित्रपटांमुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. तसेच आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ हे या चर्चांचा भाग बनले आहेत. जॅकी श्रॉफ यांनी ८०-९० या काळात सिनेसृष्टीत स्वत:चा वेगळा दबदबा निर्माण केला. पण तरीही आज ते अत्यंत सर्वसामान्य माणसांसारखं आयुष्य जगताना दिसतात.
जॅकी श्रॉफ यांनी १९८३ साली प्रदर्शित झालेल्या ‘हीरो’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ‘मस्ती में रहने का’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. तसेच सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटात देखील श्रॉफ यांनी एक लहानशी भूमिका साकारली होती. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात जॅकी श्रॉफ हे एका मंदिराच्या पायऱ्या धुवत असल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
सध्या सगळे देशवासी प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी करत आहेत. २२ जानेवारीला आयोध्येत राम मंदिरात प्रभू राचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी संपूर्ण देशात प्रत्येक ठिकाणी विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल आहे. म्हणूनच सगळे जण या दिवसाची तयारी करत आहेत. यामध्ये कलाकार मंडळीनी सुद्धा उत्साह दाखवला असून श्रॉफ यांनी सुद्धा एका जुन्या राम मंदिराच्या पायऱ्या आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून या सोहळ्यात खारीचा वाटा उचलला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. जॅकी श्रॉफ यांनी राम मंदिराच्या पायऱ्या आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करत समाजकार्यात हातभार लावला आहे. जॅकी श्रॉफ यांच्या या व्हिडिओने लोकांची मन जिंकून घेतली आहेत. जॅकी श्रॉफ यांचा हा साधेपणा लोकांना चांगलाच भावला आहे.
त्यांच्या या व्हिडिओवर अनेक युजरने कमेंट करीत लिहिले, “शून्यातून अभिनेता बनलेल्या व्यक्तीला नेहमीच त्याचे महत्त्व कळते.” तर दुसर्याने लिहिले, “जॅकी दादा एकमेव अशी व्यक्ती आहे की, ज्यांचे पडद्यावर आणि पडद्याबाहेरचेही राहणीमान साधे आहे. काहींनी जॅकी श्रॉफ यांना, “मेहनती व्यक्ती” म्हटले आहे. तसेच रामायण या मालिकेत रामाची भूमिका निभावणारे जेष्ठ अभिनेते अरुण गोविल आणि सीतेची भूमिका निभावणाऱ्या दीपिका चिखलियादेखील या उत्सवात सहभागी होण्यासाठी हजर झाले आहेत.
हे देखील वाचा: ‘भाऊ कदम आणि ओंकार भोजने’ यांच्या नाटकाला थेट परदेशातून आले प्रेक्षक