‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर सध्या बऱ्यापैकी गाजत आहे. हा चित्रपट ईदच्या एक दिवस आधी प्रदर्शित झाला त्यामुळे थोडा अडचणीत आला आहे. परंतु सलमान खानच्या चाहत्याने त्याचा मान राखून चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी इतर चित्रपटांना मागे टाकून बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. तसेच ईदच्या निमित्ताने या चित्रपटाची बंपर कमाई निश्चित आहे. कोरोना नंतर बॉक्स ऑफिसवर सर्वोत्तम ओपनिंग करणार हा चौथा चित्रपट ठरला आहे. ‘पठाण’, ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘सूर्यवंशी’ नंतर ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ओपनिंगला मॉर्निंग शोमध्ये ३० ते ४० टक्के सीटवर प्रेक्षकांची उपस्थिती दिसली.
View this post on Instagram
‘किसी का भाई किसी की जान’ या आधी अजय देवगनचा ‘भोळा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण त्याला हवा तास प्रतिसाद मिळाला नाही. तसेच सामंथा रूथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ देखिल प्रदर्शित झाला. मात्र सलमान खानच्या या चित्रपटाने थिएटर मध्ये धुराळा उडवला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १२ कोटींची कमाई केली. असे असूनही १२.५० कोटींची कमाई करणारा सलमानचा हा चित्रपट त्याचा आजवरचा सर्वाधिक कमी ओपनिंग करणारा चित्रपट मानला जातोय.
त्याच्या चाहत्यांनी चित्रपटावर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असून चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रचंड गर्दी केली होती. या चित्रपटाच खरं भविष्य मात्र आज ईदच्या दिवशी समोर येईल. त्याच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा हा चित्रपट चांगली कमाई करेल असंही बोलले जात आहे.