बॉलिवूडमधील अनेक कलाकार इंडस्ट्री मध्ये येण्यासाठी स्वतःच्या नावात बदल करतात. पण असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या खऱ्या नावापेक्षा टोपणनावाने जास्त ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिला तिच्या टोपणनावाने जास्त ओळखले जाते आणि ती अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी (Hema Malini). हेमा मालिनी यांनी ८० वे दशक त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चांगलेच गाजवले. हेमा मालिनी यांना ‘ड्रीम गर्ल’या नावाने ओळखले जाते हे आपण जाणतोच. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हेमा मालिनी याचं ड्रीम गर्ल हे नाव कसं पडलं…