सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमधील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असतात. मुग्धा तिचे आणि प्रथमेशचे फोटो सोशल मिडीयावर नेहमी शेअर करत असते. काही महिन्यांपूर्वी ‘आमचं ठरलंय!’ असं सांगत त्या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. दोघे रिलेशनमध्ये असल्याचं कळताच चाहत्यांनी दोघांवर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. काही दिवसातच या दोघांचे केळवण आणि साखरपुड्याचे फोटोसुद्धा समोर आले. दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याची उत्सुकता चाहत्यांना होती. आता मुग्धाच्या घरी लग्न समारंभ पार पडला आहे मात्र हे लग्न मुग्धा आणि प्रथमेशचे नसून तिच्या मोठ्या बहिणीचे मृदुलचे झाले आहे.
मुग्धा आणि मृदुल अनेक कार्यक्रम आणि ट्रिप्सना एकत्र असतात. मुग्धा आणि प्रथमेश यांचं ठरण्याआधी मुग्धाच्या मोठ्या बहिणीचं देखील लग्न ठरलं होतं. मुग्धाने नुकताच आपल्या बहिणीच्या मेहंदीचा व्हिडीओ ‘And it begins….’ असं म्हणत सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुग्धा तिची लहान बहिणीची जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडताना दिसत आहे. मेहुणीच्या लग्नासाठी प्रमथमेशचाही उत्साह दिसून येत होता.
आज मृदुल आणि विश्वजीत यांची लग्नगाठ बांधली गेली. त्यांच्या लग्नाचा नुकताच एक फोटो समोर आला आहे. यामध्ये दोघांनीही लाल रंगाचा पेहराव केला आहे. मुग्धाच्या मोठ्या बहिणीचे लग्न तर थाटामाटात पार पडले पण आता चाहत्यांना उत्सुकता आहे मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नाची.
View this post on Instagram