दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाला जरी दीड वर्ष झाले असले तरी सुद्धा त्यांच्या घटस्फोटची चर्चा सोशल मिडीयावर कायम चालू असते. याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर समांथा अगदी मनमोकळेपणाने देते तर नागा मात्र उत्तर देण्यास टाळाटाळ करत असतो. समांथा सोबत घटस्फोट झाल्यावर तो सोभिता धुलिपालाला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. समांथा अजूनही सिंगलच आहे.
नुकतच त्यांच लंडनच्या एका रेस्टॉरंट मधील फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये असे दिसून येत आहे की, सोभिता कॅमेरापासून तिचा चेहरा लपवत आहे. व नागा रेस्टॉरंटच्या शेफ सोबत बोलत आहे.
View this post on Instagram
‘इरफान व्हूयुज’ या युटूब चॅनलला त्याने एक मुलाखत दिली आहे त्यामध्ये त्याला समांथा सोबत घटस्फोट घेतल्याचा पश्चाताप होत असल्याचा प्रश्न विचारण्यात आला आहे. यावर त्याने म्हंटल आहे की, “मला आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप झालेला नाही. मी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा पश्चाताप नाही, कारण प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी धडा राहिली आहे. त्यातून मी काही ना काही शिकलो. मी कदाचित दोन-तीन चांगले चित्रपट नाकारले असतील, पण त्याचाही मला पश्चाताप नाही.” नवभारत टाइम्सने याबद्दल वृत्त दिलंय.