मागील काही वर्षात बॉलिवूडमध्ये सिंघमची खूपच क्रेझ पाहायला मिळाली. त्यानंतर अनेक सिनेमे आले. तरी देखील आजही सिंघम ची क्रेझ तशीच आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे.
नुकताच सिंघमचा तिसरा भाग अर्थात ‘सिंघम अगेन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा झाली. हा सिनेमा अनेक मोठ्या पडद्यावर झळकणार असून थिएटरमध्ये पुन्हा “आता माझी सटकली” हा आवाज गुंजणार आहे.
२०११ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सिंघम’ या सिनेमातून रोहित शेट्टीच्या अॅक्शन सिनेमाला सुरुवात झाली. सिंघमच्या भरघोस यशानंतर २०१४ मध्ये ‘सिंघमरिटर्न्स’ या नावाने त्याचा सीक्वेल आला. तर आता तब्बल १० वर्षानंतर या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अजय देवगण व रोहित शेट्टीच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, सिंघम या सिनेमाचे नाव या यादीत पहिल्या क्रमांकावर येतो. ‘सिंघम अगेन’ या सिनेमातून अभिनेता आणि दिग्दर्शकाची आधीचीच जोडी पुन्हा एकदा आपल्या दमदार स्टाईलने प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.
View this post on Instagram
या सिनेमाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोहित शेट्टीने नारळ फोडून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. तसेच त्या दरम्यानचे सेटवरील काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले. त्यावेळेस रोहित सोबत अजय व सिंबाच्या लूकमध्ये रणवीर सिंगसुद्धा हजर होते.
प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत असलेला हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.