बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांना सिनेसृष्टिमध्ये ‘बिग बी’ म्हणून ओळखले जाते. वयाची ८० वर्ष पूर्ण करूनही ते मनोरंजनसृष्टीत अजूनही तितक्याच जोमाने काम करत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्यं गाजवले. देशभरातच नाही तर जगभरात त्यांचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि त्यांच्या चित्रपटांमुळे ते नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असतात.
प्रभास व दीपिकाच्या ‘मल्टीस्टारर प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचे टीझर नुकतेच रिलीज झाले असून या चित्रपटामध्ये ‘बिग बी’ सुद्धा दिसणार ही चर्चा रंगली आहे. त्यांनी आत्तापर्यंत हिरो, खलनायक, वडील इतकच नाही तर ते त्यांचा मुलगा अभिषेक याच्या मुलाच्या भूमिकेतही दिसून आले आहेत. त्यांच्या कामाने त्यांनी अनेक वर्षांपासून प्रेक्षकांची माने जिंकून घेतली आहेत.
निर्मात्या प्रेरणा अरोरा ह्या सध्या प्रचंड चर्चेत आल्या आहेत, त्याचे कारण म्हणजे त्यांचा आगामी सिनेमा. त्यांनी आतापर्यंत टॉयलेट एक प्रेम कथा, परी यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले असून आता लवकरच त्या पुन्हा एकदा एक नवा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. लवकरच त्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या बायोपिकमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिकेसाठी निवड केल्याबद्दलच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.
प्रेरणा अरोर यांना विचारण्यात आले की, “नरेंद्र मोदींवर चित्रपट का बनवायचा आहे?” तेव्हा त्या म्हणाल्या की, “मी नरेंद्र मोदींना भारतातील सर्वात ‘शक्तिशाली, सुंदर आणि सक्षम’ व्यक्ती मानते. नायक म्हणून पंतप्रधानांचे व्यक्तिमत्त्व त्यांना प्रभावित करते.” त्यामुळेच त्यांनी नरेंद्र मोदींवर चित्रपट बनवण्याचा ठरवले. आता त्यांना पंतप्रधानांचं आयुष्य रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना दाखवायचे आहे.
या बायोपिकमध्ये त्या नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पडद्यावर काय दाखवणार हे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्या म्हणाला की, “परराष्ट्र धोरण स्वीकारण्यापासून ते आर्थिक विकासापर्यंत, त्यांनी कोविड-19 काळातील त्यांच्या भुमिका आणि यासोबतच पीएम मोदींचे बालपण, राजकीय कारकीर्द ते निवडणूक जिंकण्यापर्यंतचा काळ सगळंच या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.”
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, “अमिताभ बच्चन पडद्यावर पंतप्रधान मोदींची भूमिका उत्तमरीत्या साकारू शकतील असा विश्वास आहे. आता निर्मात्या प्रेरणा यांच्या या ऑफरवर अमिताभ बच्चन यांची काय प्रतिक्रिया असेल आणि ते हा सिनेमा साईन करतील का हे तर बिग बी सांगू शकतात. त्यामुळे सध्या सर्वांचेच लक्ष बिग बी यांच्या उत्तराकडे वेधले गेले आहे.