‘परिणीती आणि राघव’च्या लग्नात प्रियंका राहणार गैरहजर…
सध्या देशातील राजकारणात आणि सिनेसृष्टीत परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. विदेशात झालेली पहिली भेट नंतर त्यांच्यात झालेली मैत्री आणि बहरलेल्या प्रेमकहाणीचा आता शेवटचा टप्पा म्हणजे लग्न यासाठी सारेच उत्सुक आहेत.
परिणीती आणि राघव हे दोघे रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत होते. राघव आणि परिणीती यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले. राघव आणि परिणीती यांचा साखरपुडा ‘मे’ महिन्यात पार पडला. साखरपुड्यानंतर त्यांचे चाहते लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. तर आता परिणीती आणि राघव यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरूवात होताना दिसत आहे. परिणीती व राघव यांच्या लग्नाचा शाही सोहळा उदयपूरमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे सध्या उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. तर या शाही सोहळ्यासाठी मोठमोठी मंडळी उपस्थित असणार यात शंकाच नाही.
त्यामुळे परिणीती आणि राघव यांच्या लग्नात प्रियंका चोप्रा लग्नाला येणार की नाही असा प्रशन चाहत्यांना पडला होता. परंतू आता परिणीती आणि राघवच्या लग्नाला प्रियंका गैरहजार राहणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर या चर्चेचं कारण म्हणजे प्रियंकाने इंस्टाग्रामवर शेअर केलेली स्टोरी. परिणीतीचा एक खास फोटो शेअर करत प्रियंकाने लिहिले की, “मला आशा आहे की, तुम्ही तुमच्या या खास दिवशी तितकेच आनंदी आणि समाधानी असाल. मी तुमच्यावर नेहमीच प्रेम करते. एका नवीन सुरुवातीसाठी खूप शुभेच्छा.”
प्रियंका चोप्रा सध्या तिच्या कुटुंबासमवेत परदेशात असून बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याचे या पोस्टवरून तरी स्पष्ट झाले आहे. तर या स्टोरीमध्ये तिने त्या दोघांच्या फोटोला रेड हार्ट इमोजी देखील दिला आहे.
परिणीती व राघव येत्या २४ सप्टेंबरला विवाहबांधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नाकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.