अनेक सुपरहिट बॉलिवूड सिनेमे आज अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या नावावर आहेत. पण बॉलिवूड सोबतच तिने हॉलिवूड सिनेमांमध्ये सुद्धा नाव कमावले आहे. अमेरिकन गायक, अभिनेता निक जॉनस सोबत तिने २०१८ साली लग्नगाठ बांधली. त्याच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त तिने नुकतीच एक पार्टी आयोजित केली होती. पार्टीमध्ये त्यांचे नातेवाईक, मित्र व निकचे आई-वडील आले होते. पती निकला गोल्फ खेळ आवडत असल्याने तिने पार्टीची थीम सुद्धा तशीच निवडली होती. इतकेच काय तर पार्टीसाठी सुद्धा जागेची निवड करताना गोल्फ मैदानाची निवड केली होती. पांढऱ्या रंगाचे कपडे सर्वानी परिधान केले होते. थीमला शोभतील असेच खाद्यपदार्थ आणि केक बनवण्यात आले होते.
या पार्टीच्या फोटोंचा एक व्हिडीओ बनवून प्रियंकाने भावनिक कॅप्शन देत सोशल मीडियावर पोस्ट केला. वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायला परवानगी दिल्याबद्दल स्कॉट्सडेल नॅशनल गोल्फ क्लबच्या अधिकाऱ्याचेही प्रियंकाने आभार मानले.
View this post on Instagram
पार्टीला उपस्थित सर्वांचे आभार मानत निकने प्रियंकाने पोस्ट केलेला व्हिडीओ रिशेअर केला आहे. “आपली आवडती जागा स्कॉट्सडेल गोल्फ क्लब येथे ३० वा वाढदिवस साजरा करण्यास उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो आणि या खास गिफ्टसाठी प्रियांकाचे आभार. या प्रेमाबद्दल धन्यवाद!” या शब्दा त्याने आपले भाव व्यक्त केले.