दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाने केवळ भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटातील डायलॉग देखील प्रचंड गाजले होते. ‘झुकेगा नही झाला’ म्हणत प्रेक्षकांनी या डायलॉगवर रील्सदेखील बनवले आहेत.
पुष्पाच्या पहिल्या भागात अल्लू अर्जुनबरोबर प्रमुख अभिनेत्री रश्मिका मंदानाने स्क्रीन शेअर केली आहे. या सिनेमाचे कथानक, त्यातील अँक्शन, सिनेमातील गाणी हे सगळाच जुळून आल्यामुळे प्रेक्षकांनी या सिनेमाला उचलून धरले. या सिनेमाचा दुसरा भाग यावा अशी चाहत्यांची अपेक्षा होती. आणि ती अपेक्षा आता पूर्ण होताना दिसत आहे.
८ एप्रिलला अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त पुष्पा २ मधील त्याच्या खास लूकचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. पुष्पाच्या निर्मात्यांनी टीझर शेअर करत आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून चाहत्यांना पुष्पा २ या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागली आहे.
प्रत्येकाला प्रश्न पडला होता की पुष्पा दोन कधी येणार. या प्रश्नाचं उत्तर आता स्वत: अल्लू अर्जुनने दिलं आहे. सोमवारी अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत सांगितले की हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.
अल्लूने या चित्रपटाचं नवीन पोस्टर देखील शेअर करत चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
Also Read : Allu Arjun Blocks Former Co-Star on Twitter