अभिनेत्री अनन्या पांडे व अभिनेता आदित्य रॉय कपूर या दोघांच्या रिलेशनशिप बद्दल बोलल जात आहे. सोशल मिडीयावर देखील त्या दोघांची अधिक चर्चा होताना दिसत आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जाते. मात्र त्या दोघांनीही त्यांच्या बद्दल अजून कोणताही खुलासा मिडिया समोर केला नाही.
बऱ्याचदा त्या दोघांना पार्टीमध्ये तसेच इतर ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे कन्फर्मेशन करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये दिले आहे. जरी त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल काही सांगितले नसले तरी ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमामध्ये त्याच्या सोबत काम करणाऱ्या रणबीर कपूरने त्यांच्या बद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
क्रिती सेनन च्या दिवाळी पार्टी मधील यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोत त्या दोघांमध्ये अत्यंत जवळीक दिसून आली होती अस असूनही त्या दोघांनीही या गोष्टीवर मौन पाळणे पसंत केले. रणबीरने त्यांच्या बद्दल काही खुलासे करत सांगितले कि, ”मला माहीत आहे की आदित्यला एक मुलगी आवडते. तिचं नाव A अक्षरापासून सुरू होतं”. रणबीरचं हे वक्तव्य ऐकून चाहत्यांनी मात्र अनन्या पांडेच्या नावाचा जयघोष सुरू केला आहे.
अनन्या व आदित्य हे दोघेही बॉलिवूड मधील प्रसिद्ध कलाकार असून सध्या अनन्याही दोन प्रोजेक्ट्स वर काम करत असून त्यातला एक सिनेमा हा विक्रमादित्य मोटवानीचा आहे व दुसरा चित्रपट हा ‘call me bae’ हा आहे. तर आदित्य देखील ‘द नाईट मॅनेजर सीझन २’ मध्ये व्यस्त असून नुकतच तो ‘गुमराह’ सिनेमामध्ये पाहण्यात आला होता.