सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ची. सगळ्यांना या फेस्टिवलची खूपच उत्सुकता असते. १६ मे पासून हा उत्सव फ्रांस येथील कान नावाच्या शहरात भरतो. या उत्सवाची सुरवात १९३९ मध्ये झाली. हा जगातला एक महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे. येथे चित्रपट दाखवला जाणे हे सन्माननीय आहे. तसेच येथे मिळणारा कान्स उत्सव पुरस्कार हा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. या उत्सवाला चित्रपटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तसेच जगभरातील अनेक कलाकार, अभिनेते, अभिनेत्री आणि दिग्दर्शक या उत्सवाला येतात.
यंदा या फेस्टिवलमध्ये पुन्हा एकदा भारतीय सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हल यंदाही आलिशान आणि भव्य दिव्य पद्धतीने रंगणार आहे. कान्स फेस्टिव्हल हा मानाचा फिल्म फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्यासाठी मात्र तुम्हाला तुमचा खिसा रिकामा करावा लागेल इतकी या फेस्टिव्हलची किंमत आहे.
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अनुष्का शर्मा पदार्पण करणार आहे. ती लॉरियल पॅरिसची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आहे आणि या कंपनीचं प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच अनेक भारतीय कलाकार उपस्थित राहणार आहेत. आता या फिल्म फेस्टिव्हलच्या तिकिटांची किंमत समोर आली आहे.
हे देखील वाचा : ‘द केरळ स्टोरी’ची कमाई पाहून व्हाल थक्क…
रुबेन ऑस्टलंड यांची 76 व्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या ज्युरी अध्यक्षपदी घोषणा करण्यात आली आहे. उद्योग व्यावसायिकांसाठी महोत्सवाची तिकीट किंमत ₹5 लाख ते ₹25 लाख दरम्यान आहे.
यंदाचा हा उत्सव आणखीनच खास आहे. त्याच कारण असं की, यावर्षी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी विशेष ड्रेस कोड ठरविण्यात आला आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांसाठी कॉकटेल ड्रेस परिधान करणे बंधनकारक आहे. यामध्ये त्या ब्लॅक टॉप, ब्लॅक ट्राउझर्स आणि डार्क ट्राउझर्स किंवा फॉर्मल ड्रेसच्या ऑप्शनबरोबर परिधान करू शकतात. तर पुरुषांनी डिनर जॅकेट किंवा सूट परिधान करायचा आहे. तसेच कपड्यांबरोबर शोभतील असे शूज किंवा सॅण्डलही घालणे आवश्यक आहे. त्यामुळे जगभरातील प्रेक्षक आता आपल्या लाडक्या कलाकारला पाहण्यासठी उत्सुक आहेत.