२०२३ मध्ये सुपरहिट ठरलेला चित्रपट ‘जवान’ आणि त्यातली गर्ल गँग आठवते! अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने तिच्या इंस्टाग्राम वर एक स्टोरी टाकली आहे आणि यात जवान मधली ही खास ‘गर्ल गँग’ दिसत आहे. मराठमोळी गिरिजा ओक सुद्धा या चित्रपटात दिसली होती आणि आता यांच्या Reunion फोटोने जवान 2 येणार का? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. बॉलिवूड किंग शाहरूख खान सोबत या सगळ्या मुली झळकल्या होत्या आणि त्यांनी जवानमध्ये एक अनोखी नारी शक्ती दाखवली होती. किंग खानच्या सोबतीने त्यांनी त्यांच्या अभिनयाची जादू दाखवून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.
प्रतिभावान अभिनेत्री गिरिजा ओक हिने तिच्या भूमिकेने सगळ्यांना मोहित केलं होतं. आता गिरिजा पुन्हा ‘जवान 2’ मध्ये काम करणार का? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
येणाऱ्या काळात गिरिजा अनेक बड्या प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे. तसेच ती एक नवं कोरं नाटक घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.