बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘किसी का भाई किसी की जान‘ हा त्याचा आगामी सिनेमा. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्या ट्रेलरवर विविध कमेंट्सचा वर्षाव झाला.
सलमानचा हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अवघे काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे सध्या तो सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे सलमान खान आणि सिनेमातील इतर कलाकार मंडळीही अनेक ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान ‘द कपिल शर्मा शो’मध्ये उपस्थित होता.
या शोदरम्यान सलमानच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक प्रश्न विचारण्यात आले, त्यावर भाईजानने त्याच्या स्टाइलमध्ये खूपच गमतीशीर उत्तरे दिली. यावेळी कपिल शर्मा याने सलमान खानला विचारले की, “सगळे तुला भाईजान म्हणतात, पण ‘जान’ म्हणण्याचा अधिकार तू कोणाला दिला आहेस?”
या प्रश्नावर सलमानने उत्तर दिले की, “मी म्हणेल की, आयुष्यात ‘जान’ म्हणण्याचा अधिकार कोणालाही देऊ नका. ‘जान’ पासून स्टार्ट होतं आणि मग त्या तुमची ‘जान’ घेतात. तुझ्यासोबत मी खूप आनंदी आहे… मी शब्दांत सांगू शकत नाही…आय लव्ह यू म्हणतात… या ‘आय लव्ह यू’नंतर मुलगा फसला हे लक्षात आलं की, बास्स तुमचं आयुष्य बर्बाद…. माझ्या मते, ‘जान’ हा अपूर्ण शब्द आहे. जान ले लूंगी तेरी, उसके बाद किसी और को जान बनाऊंगी और उसके बाद उसकी भी जान ले लूंगी… कदाचित हे पूर्ण वाक्य आहे.” त्याचे हे उत्तर ऐकून प्रत्येकजण हसू लागला.
हे देखील वाचा : एक्स गर्लफ्रेंड अक्षया सोबतच्या नात्याबद्दल सुयशने केला मोठा खुलासा
किसी का भाई किसी की जान हा सिनेमा येत्या २१ एप्रिल ईदला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून सलमान खानसह पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, विजेंदर सिंग, राघव जुयाल, जस्सी गिल, भूमिका चावला आणि सिद्धार्थ निगम हे कलाकार देखील झळकणार आहेत.