दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. प्रेक्षकांनी देखील त्यांच्या या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला. आता प्रेक्षक त्या सिनेमाच्या दुसऱ्या (पुष्पा २) भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमातील अल्लू अर्जुनचा फस्ट लूक समोर आला आहे.
‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘पुष्पा २’ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी एक टीझर शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये असे दाखवण्यात आले कि, पुष्पा जेल मधून पळून गेला आहे. व जंगलात कुठे तरी लपून बसला आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. तिने पहिल्या चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारली होती.
या चित्रपटातील अभिनेत्याचा म्हणजेच अल्लू अर्जुनचा आज ८ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. त्या निम्मिताने अल्लू अर्जुनने त्याच्या ‘पुष्पा २’ चित्रपटातील लूकचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्याच्या या लूकने सर्वांचेच लक्षवेधून घेतले आहे.
View this post on Instagram
या चित्रपटातील त्याचा लूक एकदम हटके आहे. या फोटो मध्ये त्याच्या गळ्यात लिंबाची माळ अंगावर भरजरी साडी नेसली आहे. कानात झुमके व हातात बांगड्या असा शृंगार त्याने केला आहे. त्याचा हा लूक पाहून चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
हे देखील वाचा : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चे चित्रीकरण कोणामुळे रखडले?