बॉलिवुडचा सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणजेच शाहरुख खान. याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेक प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. तर आत्ता त्याचा मुलगा आर्यान खान हा देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. तो अभिनेता नाही तर दिग्दर्शक म्हणून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणार आहे. तो नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल होत असतो.
शाहरुख खानचा वारसा पुढे नेण्यासाठी त्याचा मुलगा आर्यन खान पुढे आला आहे. सुहाना पाठोपाठ आर्यन देखील बॉलिवूड क्षेत्रात आला आहे. तो दिग्दर्शक म्हणून काम करणार असून त्याने त्याची पहिली अॅड फिल्म शूट केली आहे. त्याच्या या फिल्ममध्ये दुसरे तिसरे कोणी नसून त्याचे वडील शाहरुख खानलाच दिग्दर्शित करण्यात आले आहे.
View this post on Instagram
आर्पयन खान पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे. नुकतीच त्याची एक झलक समोर आली आहे. आर्यन खानने पोस्ट केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या छोट्या व्हिडिओमध्ये शाहरुख खानची झलक पाहता येऊ शकते, आर्यनची ही जाहिरात येत्या 24 तासात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आर्यनसाठी हा खरोखरच आनंदाचा क्षण आहे कारण त्याला त्याच्या पहिल्या दिग्दर्शनाच्या प्रोजेक्टमध्ये त्याला त्याचे वडिलांना दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सध्या शाहरुखचा लेक प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे. आर्यन खान आणि त्याच्या मित्रांनी काही महिन्यांपूर्वीच लक्झरी स्ट्रीटवेअर ब्रँडबद्दल इशारा देत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता.
या व्हिडिओ क्लिपचे अनेकांनी कौतुक केले. सुहान खानने देखील तिच्या भावाच्या या कामाबद्दल त्याचे कौतुक केले आहे. ही व्हिडिओ क्लिप शेअर करण्याआधी सांगण्यात आले होत की याची पूर्ण व्हिडिओ २४ तासानंतर रिलीज करण्यात येईल या व्हिडिओला २४ तास पूर्ण होण्यासाठी आता काहीच तास बाकी आहेत. चाहते देखील ही व्हिडिओ पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
शाहरुख खानची दोन्ही मुलं सिनेसृष्टीत चांगलच नाव कमावत आहेत. त्याची मुलगी सुहाना खान झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर शाहरुख खान आत्ता डंकी आणि बॅनर्जी या चित्रपटात झळकणार आहे.