सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची. हा सिनेमा लवकरच म्हणजे २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची काही गाणी देखील प्रदर्शित झाली आहेत.
आज या चित्रपटामधील जय जय महराष्ट्र माझा या गाण्याचे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. हे गीत मूळ शाहीर साबळे याचं आहे. शिव ठाकरे पासून भरत जाधव पर्यंत अनेक मराठी कलाकार हे गीत गाताना दिसत आहेत. अजय गोगावले यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा गीत शाहीर साबळेंनी गायलं आहे. महाराष्ट्र शाहीर सिनेमानिमित्ताने हे गीत अजय गोगावले यांच्या आवाजात पुन्हा रीक्रियेट केलं गेलंय.
अजय गोगावले यांनी हे गीत गायलं असून या गीतात नागराज मंजुळे, आदेश बांदेकर, प्रथमेश परब, आकाश ठोसर, सिद्धार्थ चांदेकर, स्वप्नील जोशी, शिव ठाकरे, सिद्धार्थ जाधव, गश्मीर महाजनी, अभिजित खांडकेकर, प्रसाद ओक, उमेश कामत, सुयश टिळक, सचिन खेडेकर, आदिनाथ कोठारे, ललित प्रभाकर असे मराठी कलाकार झळकणार आहेत.
या चित्रपटाची निर्मिती केदार शिंदे यांनी केली आहे, तर अंकुश चौधरी आणि सना शिंदे हे या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. या चित्रपटातील बहरला हा मधुमास आणि गाऊ नको किसना ही गाणी प्रचंड व्हायरल झाली आहेत. प्रेक्षक देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.