रिऍलिटी शोचा बाप म्हणून ओळखला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. तर आज हिंदी बिग बॉस सिझन १६चा शेवटचा दिवस. या सिझनच्या फिनालेसाठी अवघे काही तास उरले असून बिग बॉसच्या घरातही फक्त पाच स्पर्धक उरले आहेत.
बिग बॉसचा हा सिझन आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त ठरला आहे. त्याचे कारण म्हणजे यंदाचे अफलातून स्पर्धक. हा संपूर्ण सिझन त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अखेर आज प्रतिक्षा संपणार आहे. शोच्या फिनालेची संपूर्ण तयारी झाली आहे. तर आज रात्री १२ वाजता यंदाच्या सिझनचा विजेता कोण हे समजणार आहे. होय, हा सिझन नेहमीप्रमाणे दोन-तीन तासांचा नसणार आहे. बिग बॉसच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होणार की हा ग्रँड फिनालेचा शेवटचा भाग तब्बल पाच तास चालणार आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या इतर फिनालेपेक्षा आज प्रेक्षकांना आणखी काहीतरी खास पाहायला मिळणार हे नक्की.
सध्या बिग बॉसच्या घरात राहून १६व्या पर्वाच्या ट्रॉफीसाठी झटणारे स्पर्धक म्हणजे एमसी स्टॅन, शिव ठाकरे, अर्चना गाैतम आणि प्रियंका चाैधरी. तर यातूनच आज एकजण बिग बॉसच्या १६व्या सिझनचा विजेता होणार आहे. तसेच रोहित शेट्टीने केलेल्या घोषणेप्रमाणे त्याच्या खतरों के खिलाडी या शोचा स्पर्धकही आज घोषित केला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे.
बिग बॉस १६चा ग्रँड फिनाले आज (१२ फेब्रुवारी ) संध्याकाळी ७ ते १२ मध्ये कलर्स चॅनेलवर पहायला मिळणार आहे.