सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस’ची चर्चा रंगली आहे. कारण आता हिंदी बिग बॉसचा १७ वा सिझन सुरु झाला आहे. या पर्वातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक कलाकार सज्ज झाले आहेत.
१७ व्या पर्वाचा प्रीमियर शो रविवारी पार पडला असून अखेरीस यंदा बिग बॉसमध्ये सहभागी होणारे स्पर्धक देखील समोर आले. अनेक लोकप्रिय कलाकारांनी हा सिझन दणक्यात पार पडणार यात शंका नाही. नेहमीप्रमाणे हा सिझनही ‘सलमान खान’चं होस्ट करणार आहे. सलमान खानने धमाकेदार डान्स करत बिग बॉस १७ ची सुरुवात अफलातून केली.
तर या सिझनची आणखी एक खासियत म्हणजे यंदा स्पर्धकांना एका घरात नव्हे तर तीन घरात राहता येणार आहे. बिग बॉसच्या मोठ्या घरात ‘दिल, दिमाग और दम‘ अशा तीन घरांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे या घरांचा ताबा कोणाला आणि कसा मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. तर या घरावर आणि प्रेक्षकांच्या मनावर कोण राज्य करणार हे येणारा काळाचं ठरवेल.
View this post on Instagram
बिग बॉसच्या १७ व्या सिझनमध्ये मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, ऐश्वर्या शर्मा, नील भट, नवीद सोल, अनुराग डोभाल/बाबू भैया, सना रईस खान, जिग्ना व्होरा, अंकिता लोखंडे, विकी जैन, सोनिया बन्सल, खानजादी, सनी आर्या, रिंकू धवन, अरुण माशेट्टी, अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय हे कलाकार स्पर्धक म्हणून बिग बॉस १७ च्या शो मध्ये सहभागी झाले आहेत.
View this post on Instagram
बिग बॉसची यंदाची थीम ‘कपल विरुद्ध सिंगल’ अशी आहे. यामध्ये कपल आणि सिंगल असणारे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी शोमध्ये १७ स्पर्धक असून ते तब्बल १०५ दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात राहतील. इतकेच नाही तर ब्रेकअप झालेले दोन कलाकारदेखील शोमध्ये सहभागी झाले असून ग्रँड प्रिमिअरमध्येच त्यांचं भांडण झालं, जे सोडवायला सलमान खानला मध्यस्थी करावी लागली. त्यामुळे पुढील शोची रंजकता आणखीच वाढली आहे.
हा शो प्रेक्षकांना कलर्स टीव्हीवर पाहता येणार आहे. तसेच जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवरही शोचे स्ट्रीमिंग होणार आहे.