साऊथमधील सुपरस्टार प्रभास त्याच्या नवनवीन सिनेमामुळे कायम चर्चेत असतो. आपल्या अभिनयाने तो फक्त साऊथच्याच नाही तर संपूर्ण देशभरातील रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
काही दिवसांपासून प्रभास पुन्हा एकदा चर्चेत आला होता. त्याचे कारण म्हणजे त्याचा आगामी सिनेमा. आदिपुरुषला हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. परंतू आता प्रभासचा आदिपुरुषनंतर ‘सालार’ हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आणखी एक खास गोष्ट अशी की याच दिवशी शाहरुखचा ‘डंकी’ हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे.
अशातच नुकतीच एक अजब घटना घडली आहे. प्रभासचे इंस्टाग्राम अकाउंट, इंस्टाग्रामवरून अचानक गायब झाले आहे. इतरांच्या तुलनेत प्रभास सोशल मीडियावर फारच कमी सक्रीय असतो. असे असले तरी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे अकाउंट आहेत. प्रभासचा इंस्टाग्रामवर तब्बल १० मिलअन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्याने आता त्याचे इंस्टाग्रामवरील अकाउंट स्वतः डी-अॅक्टिवेट केले आहे का? की त्याचे अकाउंट हॅक झाले आहे? की त्याच्या टीमकडून पब्लिसिटी स्टंट चालू आहे? अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे.
आगामी सिनेमाच्या तोंडावर असे काही घडल्यामुळे प्रभासचे चाहते मात्र गोंधळून गेले आहेत. एवढे असूनही प्रभास किंवा त्याच्या टीमकडून अजून कोणतीही बाब समोर आली नाही. त्यामुळे सध्या सर्वजण प्रभास आणि त्याच्या टीमच्या अॅक्शनकडे डोळे लावून आहेत.