मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सध्या लग्नबंधनात अडकत आहेत. प्रत्येकजण आपल्या लग्नात एक वेगळा ट्रेंड सेट करत आहेत. अशातच आता आणखीन एक मराठी अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी या अभिनेत्याने घरातील मंडळी आणि जवळच्या नातेवाईकांसोबत अगदी मोजक्याच माणसांमध्ये साखरपुडा उरकून घेतला.त्याचे फोटो त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली.
हा अभिनेता म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम कौस्तुभ दिवाण (Kausstubh Diwan). कौस्तुभ हा जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे घराघरांत पोहचला. या मालिकेत जसे आदित्य आणि मेघना मुख्य कलाकार होते तसेच आदित्य नगरकर म्हणजेच अभिनेता कौस्तुभ दिवाण देखील मुख्य भूमिकेत होता. या मालिकेमुळे कौस्तुभला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. यामध्ये कौस्तुभने मेघनाच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. अगदी थोड्या कालावधीसाठी तो या मालिकेत होता, पण या काळात त्याने प्रेक्षकांच्या घरात स्वतः च स्थान निर्माण केलं. यासोबतच कौस्तुभने बंध रेशमाचे, पोस्ट ऑफिस उघड आहे, तुजं माजं सपान या मालिकांमध्ये काम केल आहे. तसेच प्यारवाली लवस्टोरी, जेता, सिटीझन या सिनेमात देखील झळकला आहे. कौस्तुभ हा एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण त्याचबरोबर तो एक उत्तम लेखक देखील आहे.
काही महिन्यांपूर्वी कौस्तुभने त्याच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. कौस्तुभने त्याची प्रियसी कीर्ती कदम हिच्या सोबत जानेवरी महिन्यात साखरपुडा केला. या दोघांच लव्ह मॅरेज आहे, त्यांनी आपल नात कधीच लपवलं नव्हत. ते नेहमीच एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसून येतात. साखरपुडा झाल्यानंतर आता त्यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. अद्याप लग्नाची तारीख त्यांनी जाहीर केली नाही, पण लग्नाच्या तयारीला मात्र जोमाने सुरुवात झालेली दिसून येते.
नुकतच या दोघांचे केळवण पार पडले. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी म्हणजेच कौस्तुभच्या जवळच्या मित्र मैत्रिणींनी या दोघांचे केळवण केले. याचे फोटो आणि व्हिडीओ कौस्तुभने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी मेघा धाडे, आस्ताद काळे, स्वप्नाली पाटील, शाल्मली टोळ्ये, शिल्पा नवलकर, राजन ताम्हणे यांनी मिळून दोघांचे १८ मार्चला केळवण केले.
यावेळी अगदी मज्जा मस्ती करत आणि छान छान पदार्थ खाऊन केळवण पार पडले. याचे फोटो कौस्तुभने शेअर करत त्याखाली लिहिले की, “आम्ही प्रेम करतो, हसतो, भांडतो, रडतो, शेअर करतो, काळजी करतो आणि हो, आम्ही जोरदार पार्टीही करतो. आम्ही कुटुंब आहोत. १८/०३/२०२४ केळवण”.
अशा पद्धतीने आणखी एक कलाकार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.