‘द गेम ऑफ गिरगिट’ अदा शर्मा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे: सध्याचा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला सिनेमा म्हणजे ‘द केरळ स्टोरी‘. असे असूनही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. तसेच प्रेक्षकांचे मन देखील जिंकून घेतले आहे. या सिनेमात सर्वाधिक लक्षवेधी भूमिका ठरलेली भूमिका म्हणजे फातिमा बा.
द केरळ स्टोरीमधील ही महत्वाची भूमिका अभिनेत्री ‘अदा शर्मा’ हिने साकारली आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तिच्या या भूमिकेचे सर्वत्र चर्चाही झाली अन् कौतुकही. या सिनेमामुळे तिच्या लोकप्रियतेतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता ती कोणत्या सिनेमात पाहायला मिळणार याची वाट प्रेक्षक पाहत होते, परंतू आता त्यांची प्रतिक्षा संपली आहे.
अदा शर्मा ‘द गेम ऑफ गिरगिट’ या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी ती मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याच्या सोबत झळकणार आहे. अदा आणि श्रेयस हे दोघेही या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र अदा शर्मा आणि श्रेयस तळपदे यांच्या ‘द गेम ऑफ गिरगिट’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाची कथा ‘ब्लू व्हेल गेम’ या खेळावर आधारित आहे. हा ऑनलाइन खेळ मागील काही वर्षांत तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय झाला होता. गुरुवारी या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. त्यामध्ये दाखवण्यात आले आहे की अदा ही पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार श्रेयस अॅप डेव्हलपरची भूमिका साकारणार आहे.
या सिनेमातील भूमिकेबद्दल सांगताना अदा शर्मा म्हणाली की, “द गेम ऑफ गिरगिटमध्ये मी भोपाळमधील पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. सिनेमात मी ‘ब्लू व्हेल अॅप’च्या गेममुळे होणार नुकसान आणि त्या जाळ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना दिसणार आहे. यापूर्वी देखील ‘कमांडो’ सिनेमात मी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.”
तसेच श्रेयस म्हणाला की, “सिनेमात मी अॅप डेव्हलपरची भूमिका करणार आहे. तसेच मी नव्या प्रवासासाठी उत्सुक आहे. हा सिनेमा लहान मुलं आणि तरुणांना फार आवडेल.”
अदा आणि श्रेयस यांची ही अनोखी जोडी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग फारच उत्सुक असून सिनेमाबद्दलची त्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.
हे पण वाचा: “इंडस्ट्रीतील लोकही मला.” नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी सांगितला सिनेसृष्टीतील त्यांचा अनुभव