झलक दिखला जा चा सीझन 10 जेव्हापासून प्रदर्शित झाला तेव्हापासून तो चर्चेचा विषय बनला आहे. विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेत असतात. या यशस्वी सीझननंतर या शोने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
माधुरी दीक्षित, करण जोहर आणि नोरा फतेही हे या शोचे परीक्षक होते तर मनीष पॉलने सूत्रसंचालन केले.
झलक दिखला जा 10 च्या ट्रॉफीसाठी झुंजणारे गश्मीर महाजनी, रुबिना दिलिक, गुंजन सिन्हा, तेजस वर्मा, श्रुती झा, निशांत भट आणि फैसल शेख हे टॉप 6 स्पर्धक होते. निशांत, सृती आणि गश्मीरच्या एलिमिनेशननंतरन फैसल शेख, गुंजन सिन्हा आणि अभिनेत्री रुबिना दिलेक हे टॉप 3 मध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरले. संपूर्ण सीझनमध्ये या स्पर्धकांनी त्यांचे जबरदस्त परफॉर्मन्स सादर केले. आणि अनेकदा परीक्षक आणि प्रेक्षकांनी त्यांचे कौतुक केले.
View this post on Instagram
या शोने प्रेक्षकांना प्रचंड वेड लावले होते आणि चाहते या शो ची वाट पाहत होते. आठ वर्षीय स्पर्धक गुंजन सिन्हा हिने फैसल आणि रुबिना यांना मागे टाकत बाजी मारली आहे. गुंजनला कोरिओग्राफर तेजस वर्मासह झलक दिखला जा सीझन 10 चा विजेता म्हणून घोषित करण्यात आले. गुंजनला ट्रॉफीसह रोख बक्षीस म्हणून 30 लाख रुपयेही मिळाले आहेत. वयाने लहान असूनही गुंजन सिन्हाने संपूर्ण शोमध्ये तिच्या सह-स्पर्धकांविरुद्ध अपवादात्मकपणे स्पर्धा केली आणि प्रत्येक वेळी परीक्षाक , विशेष पाहुणे आणि प्रेक्षकांकडून टाळ्या मिळवल्या.
गुंजन सिन्हाचे हार्दिक अभिनंदन!