लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूड सोबतच हॉलीवूडमध्ये देखील चांगलाच ठसा उमटवला आहे. मागील काही दिवसापासून प्रियांका चांगलीच चर्चेत आहे. मागच्या महिन्यात प्रियांका संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सभेसाठी न्यूयॉर्कला गेली होती. प्रियांका UNICEF च्या बालहक्क विभागाची सदिच्छा दूत ( Goodwill Ambassador ) आहे. त्यामुळे तिला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बालहक्कांसाठी कामे करावी लागतात, कार्यक्रमांना उपस्थित राहून महासंघाची बाजू मांडवी लागते. सध्या UNICEF तर्फे केनिया सारख्या आफ्रिकन देशांमध्ये सर्वेक्षण सुरु आहे. या कामांमध्ये मदत करण्यासाठी प्रियांका केनियाला गेली आहे.
प्रियांका सोशल मिडियावर नेहमीच सक्रीय असते. सध्या ती केनियाला गेली आहे. तिने इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओच्या सुरवातीला प्रियांका म्हणाली, “मी सध्या खूप अस्वस्थ आहे. माझ्या मनामध्ये सुरु असलेल्या असंख्य विचारांमुळे मला एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं अशक्य झालंय. मी खिन्न अंत:करणाने तुमच्याशी संवाद साधतेय. न्यूयॉर्कवरुन मी जेव्हा केनियाला जाण्यासाठी निघाले, अगदी तेव्हापासून माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु आहे. आम्ही (मी आणि UNICEF टीम) केनियामधील गंभीर स्थितीचा आढावा घेत आहोत. एक आई म्हणून या गोष्टी अनुभवणं खूप कठीण आहे.”
View this post on Instagram
वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे आफ्रिकेतील अनेक देशांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे तिथे गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळ पडला आहे, आणि याचा परिणाम तेथील लहान मुलांवर होत असल्याच प्रियांकाने सांगितले आहे.
“काही दिवसांपासून मी UNICEF द्वारे सुरु असलेल्या उपक्रमांमध्ये भाग घेत आहे. केनियासारख्या अन्य देशांमधील लहान मुलांचे हाल होऊ नये म्हणून टीम खूप मेहनत घेत आहे. त्यांच्या प्रयत्नांना तुमची साथ हवी आहे. माझ्या बायोमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही त्यांना आर्थिक मदत करु शकता. या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये पैसा हा खूप महत्त्वपूर्ण घटक आहे.” असं प्रियांका म्हणाली. तिने यामध्ये संयुक्त राष्ट्र महासंघाद्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी सांगितले.