प्रत्येकालाच सुंदर दिसायचे असते आणि आपण स्वतःला कायमच सुंदर मानत असतो. परंतू सौंदर्याचा उल्लेख आला की मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे वेगवेगळया अभिनेत्रींची नावे. त्यातील एक नाव म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण.
आत्तापर्यंत दीपिकाने तिच्या अभिनयाने आणि कामाने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जगभरात तिचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. “ओम शांती ओम” या चित्रपटातून दीपिकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आतापर्यंत बाजीराव मस्तानी, यह जवानी है दिवानी, राम लिला, चेन्नई एक्स्प्रेस यांसारख्या अनेक चित्रपटांतून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
दीपिकाने असंख्य पुरस्कारांवर आपले नाव कोरले. त्यात आणखी एका बहुमानाची भर पडली. तिने तर आता एक आंतरराष्ट्रीय बहुमान पटकावला आहे. जगातील टॉप १० सुंदर महिलांच्या यादीत दीपिकाचा समावेश झाला आहे. दीपिका पदुकोण ९१.२२ टक्के गुणांसह जगातील दहा सर्वात सुंदर महिलांच्या यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे. ब्रिटीश अभिनेत्री ‘जोडी कोमर’ हिला जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर दीपिकाने या यादीत नववे स्थान पटकावले आहे.
View this post on Instagram
प्राचीन ग्रीकच्या मते, एखाद्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावरील विशिष्ट गुणोत्तरानुसार सौंदर्य मोजले जाऊ शकते. तर नुकतंच एका शास्त्रज्ञाने ही यादी जाहीर केली आहे. त्यांनी जगातील सर्वात सुंदर महिलांचे सौंदर्य मोजण्यासाठी एका प्राचीन ग्रीक तंत्राचा वापर केला. त्यासोबत त्यांचे संगणकावर मॅपिंग केले आणि निष्कर्ष काढला. या पद्धतीला ‘गोल्डन रेशिओ ऑफ ब्युटी’ असेही म्हणतात.
या तंत्रानुसार जोडी कॉमर, झेंडाया, बेला हदीद, बियॉन्से, एरियाना ग्रांडे, टेलर स्विफ्ट, जॉर्डिन डन, किम कार्दशियन, दीपिका पदुकोण आणि होयॉन जंग या १० महिलांनी हा बहुमान पटकावला आहे.