बॉलीवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान नेहमीच तिच्या बोल्ड लुक मुळे चर्चेत असते. करीनाने २०१२ मध्ये बॉलीवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान याच्या सोबत लग्न केले होते. करीना आणि सैफ मध्ये १० वर्षाच अंतर आहे, तर करीना ही सैफची दुसरी बायको आहे. करीना आणि सैफने २०१६ मध्ये तैमुरला जन्म दिला, आणि २०२१ मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला त्याच नाव ‘जहांगीर’ अस आहे.
करीना कपूर खान सोशल मिडिया वर नेहमीच सक्रीय असते. ती नेहमी बिनधास्त पणे तीच मत व्यक्त करताना दिसून येते. ती तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल नेहमी उघड पणे बोलते. नुकतच तिने तिच्या लग्नानंतर सिनेसृष्टीत काम करण्याबद्दल खुलासा केला आहे.
“पूर्वी लग्न करणं ही एखाद्या अभिनेत्रीसाठी मोठी गोष्ट मानली जायची. पण आता काळानुसार सर्व काही बदललं आहे. तुम्हाला तुमच्या वयाचा अभिमान असायला हवा. आज महिला धाडसी झाल्या आहेत. त्या धाडसी निर्णय घेत आहेत. आता तुमच्या वैवाहिक जीवनाचा तुमच्या करिअरवर कोणताही परिणाम होत नाही. आता अनेक चित्रपट निर्माते जोखीम पत्करून वेगवेगळ्या लोकांना संधी देत आहेत. अनेक ऑफबीट स्क्रिप्टवर काम करत आहेत. अनेक संधीही निर्माण होताना दिसत आहेत.
View this post on Instagram
तुमचे वर्क लाईफ बॅलन्स करण्यासाठी कोणताही फॉर्म्युला किंवा काही सिक्रेट नाही. तुम्हाला तुमचे आयुष्य कसं जगायचं हे ठरवायचं आहे. मला काय करायचे आहे आणि काय नाही, हे तुम्हालाच ठरवायचे आहे. जेव्हा मला एखाद्या गोष्टी करायच्या नसतात, तेव्हा मी त्याला स्पष्टपणे नकार देते.
जेव्हा मला माझ्या मुलांना एकटे सोडायचे नसते किंवा अवॉर्ड शोमध्ये जायचे नसते, तेव्हा मी त्याला स्पष्ट नकार देते. मी माझ्या आवडीनिवडी ठरवल्या आहेत. मी माझ्या पतीबरोबर घरी बसून एखादा शो पाहते किंवा कधी कधी एक ग्लास वाइन पिते, हे मला जास्त आवडते. मी वैयक्तिकरित्या अनुभव घेत असलेल्या सर्वात मोठ्या बदलांपैकी हा एक आहे. वर्क लाईफचा बॅलन्स करणे या गोष्टी माझ्या स्वत:वर अवलंबून आहेत.” असे करीनाने म्हटले.
करीना कपूर खान ही बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत थ्री इडियट्स, बजरंगी भाईजान, जब वी मेट असे अनेक हिट चित्रपट केले आहेत. सध्या ती तिच्या आगामी ‘द क्रू’ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तब्बू आणि क्रिती सेनॉन दिसणार आहेत.