२०२३ हे वर्ष आता संपायला अवघे २ ते 3 दिवस बाकी आहेत. तरी यंदा अजूनही लगीनसराई सुरूच आहे. फक्त सर्वसामान्यांच्याच नाही तर सध्या सिनेसृष्टीत देखील लग्नाचे वारे वाहत आहेत. अशातच यंदा आपल्या अनेक लाडक्या कलाकारांनी लग्नगाठ बांधली. त्यात आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) हिचा देखील समावेश आहे.
गौतमी नुकतीच लग्नबंधनात अडकली, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या कामाशिवाय तिच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. २५ डिसेंबर रोजी मोठ्या थाटामाटात गौतमीचा विवाहसोहळा पार पडला. गौतमीने स्वानंद तेंडुलकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्या दोघांचे मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी या सर्व कार्यक्रमातील खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. लग्नापूर्वी गौतमी आणि स्वानंद यांच्या नात्याची एवढी चर्चा रंगली नाही, परंतू त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेकांना संशय होता. परंतू त्यांची प्यारवली लव्हस्टोरी कोणालाच माहित नव्हती.
View this post on Instagram
आता लग्नाला २-३ दिवस उलटून गेले तरी, गौतमी आणि स्वानंदचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ नव्याने त्यांच्या चाहत्यांसमोर येत आहेत. दरम्यान गौतमीने तिच्या इंस्टाग्रामवर नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली. तिने लग्नसमारंभातील मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी अशा सर्वच क्षणांची झलक दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये गौतमी आणि स्वानंद या दोघांनी स्वतः त्यांच्या प्रेमाची गोष्ट सांगितली. ज्यात त्यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली? त्यांच्याच मैत्रीसाठी हात कोणी पुढे केला? त्यांच्यात प्रेमाचं नातं कसं निर्माण झालं? कोणी कोणाला आधी प्रपोज केलं? अशा काही प्रश्नांची उत्तरे देत त्यांची त्यांची प्यारवली लव्हस्टोरी आपल्या सोबत शेअर केली.
View this post on Instagram
नात्याची सुरुवात कशी झाली हे सांगताना स्वानंद म्हणतो की, “खूप प्रामाणिकपणे सांगतो. मुळातच मला ती बघूनच आवडली होती. तिला मी हे सांगितलं नाही. आता मी ही गोष्ट सांगतोय. तिला मी विचारलं होतं, मी डेट करू शकतो का? ती मला म्हणाली, नाही.” त्यावर गौतमी म्हणाली की, “थोडीशी मैत्री वाढली, बोलणं वाढलं. त्याच्यानंतर मला तो जास्त आवडायला लागला आणि मला नंतर कळलं की, हे सगळं मस्त चाललंय. छान आहे हे सगळंच. खूप गोड आहे.”
त्यानंतर लग्नातील त्या दोघांचे खूपच सुंदर क्षण पाहून प्रत्येकालाच ही जोडी Made for each other वाटली हे नक्की. त्यांच्या या सुंदर व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना संसारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.