खतरों के खिलाडीच्या १३ व्या पर्वात ‘डिनो जेम्स’ने मारली बाजी :
‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोनंतर सर्वांना ओढ लागलेली असते ती म्हणजे ‘खतरो के खिलाडी’ या शोची. या कार्यक्रमाचा नुकताच १३ वा सिझन पार पडला. सध्याचा हा टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे.
या पर्वात वेगवेगळे कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होताना पाहायला मिळतात. तसेच यंदाच्या १३ व्या सिझनमध्ये अर्चना गौतम, शझान खान, रोहित रॉय, शिव ठाकरे, अंजली आनंद, अंजुम फकीह, डेझी शाह, डीनो जेम्स, रुही चतुर्वेदी, ऐश्वर्या शर्मा, निरा एम बॅनर्जी, सौंदास मौफकीर आणि अरिजित तनेजा हे कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.
तब्बल १३ आठवडे वेगवेगळे स्टंट पूर्ण करून यंदाच्या सिझनची महाअंतीम फेरी पार पडली असून डिनो जेम्स याने यंदाच्या पर्वात बाजी मारली आहे. फिनालेचा शेवटचा स्टंट पूर्ण करत डिनो जेम्स ही ट्रॉफी जिंकली. यंदाचा १३ वा सिझन हिट झाला असून टीआरपीच्या बाबतीत देखील तो आघाडीवर होता.
तसेच या शोचा विजेता झाल्यामुळे डिनोला २० लाखांच बक्षीस व मारुती स्विफ्ट कार देण्यात आली. अरिजित तनेजा आणि ऐश्वर्या शर्मा यांना टॉप ३ मध्ये समाधान मानावे लागले. तर मराठमोळा शिव ठाकरे टॉप ५ पर्यंत पोहोचला होता.
शो सुरू असताना सोशल मीडियावर चाहते आपल्या आवडत्या सेलेब्रिटींना प्रोत्साहन देत होते. यंदाच्या टास्कमध्ये स्पर्धकांना सर्वप्रथम दोरीच्या सहाय्याने हेलिकॉप्टरवर चढून जाळ्यात अडकवलेली चावी घेऊन पाण्यात उडी मारायची होती त्यानंतर स्पर्धकांना पोहून एका बोटिपर्यंत जायचे होते. तेथे डायनामाइटचा एक तुकडा ठेवण्यात आला होता. तो उचलून हात हलवायचा होता.
View this post on Instagram
नंतर दुसरी बोट येणार ज्याच्या मागे दोरीने बांधलेल्या जाळीवर स्पर्धकांना जायचे होते आणि त्यानंतर ही बोट पाण्यात वेगाने पुढे जात असताना स्पर्धकांना त्यावर ठेवलेली एक चावी मिळवायची होती. ती चावी घेऊन एका कंटेनरवर चढायाचे तिथून डायनामाइट घेऊन पाण्यात उडी मारायची होती.
मग स्पर्धकाला पाण्यातून बाहेर पडून एका कंटेनरवर चढून तेथे लावलेले कुलूप उघडून आत जाऊन डायनामाइटचा प्रत्येक भाग जोडायचा होता. हे पूर्ण केल्यानंतर बटण दाबून टास्क पूर्ण करायचा होता. शेवटच्याच टास्कप्रमाणे संपूर्ण पर्वातील सर्वच टास्क उत्तम पार पाडून हे यश मिळवले आहे. त्यामुळे सध्या त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.