सध्या मुंबईत सर्वीकडे आयपीएलची हवा पाहायला मिळत आहे. आयपीएलचा १६ वा सीझन सुरु आहे. या सामन्यांना अनेक कलाकार त्यांच्या अगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावताना दिसून येतात. नुकताच सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सनं हैदराबादच्या घरच्या मैदानावर आयपीएलच्या सिझनमधील पहिला सामना ७२ धावांनी जिंकला.
‘सर्किट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयपीएलच्या स्टुडीओमध्ये हृता दुर्गुळे व तिचा सहकलाकार वैभव तत्ववादी यांना मॅचच्या मध्ये पाहून मराठी प्रेक्षकांना खूप आनंद झाला. आयपीएलच्या प्लॅटफॉर्मवर प्रमोशन करणारा ‘सर्किट‘ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. त्यावेळी वैभव तिथे खूपवेळा कॉमेंट्री करताना देखील दिसला.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून हृता व वैभव पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात अभिनेता वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमामध्ये या दोघांचा एकदम हटके व वेगळा अंदाज पाहायला मिळणार असून पडद्यावर या दोघांची जोडी एकदम फ्रेश दिसत आहे.
येत्या ७ एप्रिलला सिनेमा प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट आणखी एका कारणाने खास आहे या सिनेमाचे निर्माते प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर हे आहेत. ‘सर्किट’ या सिनेमातून पहिल्यांदाच ते मराठी क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. दरम्यान, चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.