बॉलिवूडचा किंग खान हा सध्या त्याच्या ‘जवान’ या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ने दहीहंडीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर दमदार एंट्री केली.
२५ जानेवारीला प्रदर्शित झालेला शाहरुख खानच्या ‘पठाण’ ह्या सिनेमाने भारतातच नाही तर जगभरामध्ये नाव कमावले. पठाणमधून तब्बल वर्षानंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यावर दिसला होता. हे पाहून त्याचे चाहते प्रचंड खुश झाले. त्यानंतर आता ‘जवान’मुळे त्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहताना चाहत्यांना खूपच आनंद होत आहे. तसेच त्याचा ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेला ‘जवान’ हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
जवानने पहिल्याच दिवशी – ७५ कोटी, दुसऱ्या दिवशी – ५३. २३ कोटी. तिसऱ्या दिवशी – ७७.८३ कोटी तर चौथ्या दिवशी देखील जवानने इतर सिनेमांना मागे टाकत तब्बल ८२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील जवानची हवा आणि रसिक प्रेक्षकांमाधील क्रेझ लक्षात येते.
जवानने फक्त चार दिवसांतच इतर सिनेमांचा रेकॉर्ड मोडल्याच दिसून येत आहे. चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी सिनेमाने सर्वात जास्त कमाई केली आहे. अल्पावधीतच फार मोठी कमाई करणारा हा भारतातील पहिला सिनेमा असावा. तर आता हा सिनेमा आणखी किती कमाई करणार याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर आणखी नवनवीन किती आणि आधीचे कोणकोणते रेकॉर्ड मोडणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
आता किंग खानच्या जवानची खासियत म्हणजे हा सिनेमा जगातील सर्वात मोठ्या आयमॅक्स स्क्रीनवर प्रदर्शित झाला असून तो जर्मनीतील लिओनबर्ग येथील फिल्मपार्क स्टुडिओमध्ये आहे. स्क्रीन १२५ मीटर रुंद आणि ७२ मीटर उंच आहे. एवढ्या मोठ्या पडद्यावर भारतीय सिनेमा प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ असेल.