भारतीय सिनेसृष्टीतील क्यूट कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या गोड नात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. लग्नानंतर त्यांनी दोन मुलांना जन्म दिला आहे. आता, रितेश आणि जेनेलिया यांच्या सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा त्यांच्या घरी नवीन पाहुणा येणार की काय अशी कुजबुज सध्या त्यांच्या फॅन्समध्ये सुरू आहे.
रितेश आणि जेनेलिया नुकत्याच एका फॅशन स्टोअरच्या लाँचिंग सोहळ्याला उपस्थित होते. इव्हेंट दरम्यानच्या व्हिडिओमध्ये जेनेलियाने जांभळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता. फोटोशूटच्या दरम्यान तिने तिच्या पोटावर हात ठेवला आहे, त्यामुळे तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आले आहे.
जेनेलियाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्स करत प्रेग्नेंसीबद्दल विचारले आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही.
View this post on Instagram
रितेश आणि जेनेलिया यांनी २०१४ मध्ये रियान आणि २०१६ मध्ये राहिल या दोन मुलांना जन्म दिला. ते दोघेही अनेकदा त्यांच्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करतात.
रितेश आणि जेनेलिया दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचे रिल्स चाहत्यांना आवडतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ते नेहमी स्वतःचे फोटोज आणि व्हिडिओज इंस्टाग्रामवर शेअर करत असतात.
जेनेलियाच्या प्रेग्नेंसीबद्दल सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबद्दलचा नेमका खुलासा लवकरच होईल अशी सर्वांना अपेक्षा आहे.