मोठ मोठ्या कलाकारांना, गायकांना, उद्योजकांना जीवे मारण्याच्या धमक्या येणं ही काही नवीन गोष्ट नाही. अनेकांवर हल्ले देखील होतात. यामुळे अनेकांनी आपला जीव देखील गमावला आहे. २०२२ मध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याला देखील ई – मेलद्वारे धमकी देण्यात आली होती आणि धमकी दिल्यानंतर काहीच दिवसात त्याची गोळी झाडून हत्या देखील करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर मात्र संपूर्ण देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर काही महिन्यांनी सिद्धू मुसेवालाचा जवळचा मित्र आणि त्याच्या वडिलांना देखील अनेकदा जीवेमारण्याच्या धमक्या आल्या आहेत.
सिद्धूच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेता आणि बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याला देखील अनेकदा ई – मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी सलमान खानचे वडील म्हणजेच सलीम खान यांना मॉरनिंग वॉक दरम्यान एका चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती. आणि त्या चिठ्ठीमध्ये ‘मुसेवाला जैसा कर देंगे’ असं लिहिलं होत. त्यावेळी त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यानंतर सलमान खानला ई – मेलद्वारे धमकी देण्यात आली होती. या मेलनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यावेळी सलमानने बुलेटप्रुफ कार देखील खरेदी केली होती. आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी सलमानला पिस्तुलचं लायसन्स देखील देण्यात आलं होत. सलमानला या धमक्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई कडून येत असल्याचे म्हटले जात होते. कारण बिश्नोई गँगकडून सलमानला अनेकदा धमकी देण्यात आली होती. एकदा एका मुलाखती दरम्यान लॉरेन्स बिश्नोईने उघडपणे धमकी दिली होती, “सलमान खानला मारणे हेच माझ्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे.” यानंतर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता आणि गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील घराबाहेर हल्ला केला होता, गिप्पीयाचा सलमानसोबत खास नात असल्याकारणाने हा हल्ला केला होता.
View this post on Instagram
तर आता पुन्हा एकदा सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास दोन अज्ञांतंकडून चार राउंड फायर करण्यात आले आहे. यानंतर त्याच्या घराबाहेर सुरक्षकांची आणि पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच फॉरेन्सिक डीपार्टमेंट, वांद्रे पोलीस आणि पोलिसांच्या विविध टीमकडून तपास सुरु करण्यात आला आहे. या संबंधित सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे, आणि गोळीबार करणाऱ्या अज्ञातांचा तपास देखील सुरु आहे. हा गोळीबार देखील लॉरेन्स बिश्नोईकडून करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.