बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १७’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मागील प्रत्येक सिझन प्रमाणेच या सिझनमध्ये देखील स्पर्धकांचे आपापसात तर खेळात धमाके पाहायला मिळणार.
बिग बॉसच्या घरात पहिल्याचं दिवशी स्पर्धकांमध्ये रूमवरून जोरदार भांडण झाले. बिग बॉसच्या घरातील पहिलाचं दिवस प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरला आहे. तसेच अभिषेक व ईशा मालवीयाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली असून हे दोघे कुठे राहणारं यावरून त्यांच्यात वाद सुरु असताना, दरम्यान ते दोघे एकमेकांवर ओरडले असता घरातील इतर स्पर्धकांनी त्यांची खिल्ली उडवली. तसेच पहिल्याचं दिवशी विकी जैनला देखील बिग बॉसने सुनावले.
सनी व अभिषेक यांच्यात किचनच्या ड्यूटीवरून वाद झाला असून जिग्ना, सना, अरुण आणि नावेद यांनी या ड्युटी बाबत चर्चा करुन निर्णय घेतला.
बिग बॉसच्या घराचे दिल, दिमाग, दम या तीन भागात विभाजन केले असून यंदा १७ स्पर्धक घरात लॉंक झाले आहेत. थीमवर आधारित मोहल्ला १, मोहल्ला २ आणि मोहल्ला ३ या भागात राहत आहेत. तर पहिल्याच एपिसोडमध्ये या तिन्ही भागात जाण्याबाबत कुटुंबातील सदस्य खूपच गोंधळलेले दिसले. आता दुसऱ्या दिवशी स्पर्धक घरात कसे राहतात आणि त्यांच्यामध्ये किती वाद होतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता अगदीचं शिगेला पोहोचली आहे.
तसेच बिग बॉसचे नवीन गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ते गाणे वाजताचं स्पर्धक नाचताना दिसतात. बिगबॉसने स्पर्धकांना घरातील व गाण्याबद्दल काही नियम व अटी देखील सांगितल्या आहेत.
अंकिता लोखंडेला फेव्हर दिले असून ती त्याची फेव्हरेट स्पर्धक असल्याचे बिग बॉसने सांगितले आहे. तर आता यापुढे नक्की काय-काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.