सध्या मराठी सिनेसृष्टीत शिवचित्रपटांची घोडदौड सुरू आहे. एकामागोमाग एक शिवकालीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
यातील सर्वात चर्चेत असणारा ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ हा आगामी सिनेमा. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाची घोषणा करण्यात आली. या सिनेमाचे दिग्दर्शन लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर करीत आहेत.
या सिनेमात प्रवीण तरडे, सिद्धार्थ जाधव, हार्दिक जोशी, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम हे तगडे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. या सिनेमाशी निगडीत प्रत्येक व्यक्ती प्रचंड मेहनत देखील करत आहे.
View this post on Instagram
वेडात मराठे वीर दौडले सातच्या शूटिंग दरम्यान अभिनेता उत्कर्ष शिंदे याला दुखापत झाली आहे. त्याने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत या घटनेचा खुलासा केला. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओवरून त्याच्या हाताचे एक बोट फ्रॅक्चर झाल्याचे समजत आहे. तसेच त्याच्या तळहातालाही जखम झाली आहे.
हा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षने लिहिले की, “सोडून देणारे कधीच जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधीच सोडत नाहीत.” त्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि त्याचे शुभचिंतक काळजीपोटी त्याची विचारपूस करताना दिसत आहेत तसेच त्याला काळजी घेण्याचा सल्लाही देत आहेत.
उत्कर्ष या सिनेमात सूर्याजी दांडकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी बीग बॉस मराठीमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तर त्याचा हा आगामी सिनेमा कधी प्रदर्शित होणार याचीच वाट त्याचे चाहते आतुरतेने पाहत आहेत.