प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सिनेमा. प्रेक्षक प्रत्येक सिनेमाची अगदी उत्सुकतेने वाट पाहत असतात. सध्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच बॉलिवूडला टक्कर देण्यासाठी २ तगडे मराठी सिनेमे येत आहेत. पण हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी येणार म्हणटल्यावर कोणता सिनेमा चालणार आणि कोणता आपटणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
View this post on Instagram
येत्या शुक्रवारी म्हणजेच २८ एप्रिल रोजी मराठी मधील दोन मोठे सिनेमे येणार आहेत. केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर‘ आणि भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम (TDM)’. तर हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.
केदार शिंदे यांचा बहुचर्चित सिनेमा महाराष्ट्र शाहीर हा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे. केदार यांनी गेली ५ वर्षे या सिनेमावर अभ्यास केला आहे. अखेर २८ एप्रिल रोजी हा सिनेमा सगळ्यांना चित्रपटगृहात पाहता येणार आहे. या सिनेमात शाहीर साबळे यांच्या भूमिकेत ‘अंकुश चौधरी’ दिसणार आहे, तसेच केदार शिंदे यांची मुलगी ‘सना शिंदे’ ही देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
तर प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा टीडीएम हा सिनेमा देखील २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. टीडीएमच्या ट्रेलरने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट ग्रामीण भागातील असल्यामुळे प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत. बबन आणि ख्वाडा नंतर भाऊराव कऱ्हाडे यांचा टीडीएम धुमाकूळ घालायला येतोय. रोमान्स आणि ॲक्शनचा तडका असलेला हा सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे.
हे सगळ बघता आता टीडीएम हा महाराष्ट्र शाहीरला टक्कर देणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर उद्या कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.