२०२१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असून रश्मिका मंदाना आणि फहद फाजीलसह अनेक कलाकारांचा दमदार अभिनय आपल्याला पाहायला मिळाले. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले होते. ‘पुष्पा’ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा दिग्दर्शक सुकुमार यांनी केली होती. त्यामुळे प्रेक्षकांनाही ‘पुष्पा २’ बद्दल आतुरता होती. त्याचे चाहते आता ‘पुष्पा २’ची आतुरतेन वाट पाहत आहेत.
‘पुष्पा – द रुल’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. हा सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. ८ एप्रिल या दिवशी अल्लू अर्जुनचा वाढदिवस असतो त्यामुळे या दिवशी ‘पुष्पा २’चा टीझर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. पण काही कारणांमुळे ‘पुष्पा २’चे चित्रीकरण थांबवण्यात आले. हे ऐकून चित्रपटाच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
या चित्रपटाचे आत्तापर्यंतचे झालेल्या चित्रीकरणाचे फाईनल आऊटपुट पाहता चित्रपटाचे निर्माते व दिग्ग्दर्शक खुश नसल्याचे सांगितले जात आहे. ‘पुष्पा २’चे चित्रीकरण थांबवण्या मागचे कारण खुद्द दिग्दर्शक सुकुमार हे आहेत. चित्रित केलेल्या सीन्सच्या बाबतीत समाधानी नसल्यामुळे ‘पुष्पा २’ चा टीझरही प्रदर्शित होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विजागमध्ये महिन्याभराच्या शेड्यूल नंतर चित्रीकरण थांबवण्यात आले होते, जे अजुनही सुरू झालेले नाही. दिग्दर्शक सुकुमार यांना आत्तापर्यंत जे काही शूट केले आहे ते सर्व डिलीट करुन सगळे सीन्स पुन्हा चित्रित करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.