अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आणि प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला ‘आदिपुरुष‘ सिनेमा आज (१६ जून रोजी) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
प्रदर्शित होण्यापूर्वीच असंख्य बदल आणि वादाला तोंड देत अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाला. अनेक अडचणींना सामोरे गेल्यानंतर प्रेक्षकांना ही कलाकृती कशी वाटेल या बद्दल सर्वांच्या मनात शंका होतीच. पण आज पहिल्याच दिवशी या शंकेचे निरसन झाले.
आदिपुरुष या सिनेमाचे शूटिंग तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात झाले असून. या सिनेमात चाहत्यांचा लाडक्या ‘प्रभास‘चे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे त्याला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे असंख्य चाहते उत्सुक होते. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा सिनेमा हिंदी, तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. त्यामुळे विविध भाषिक प्रेक्षक आजपासून हा सिनेमा पाहु शकता.
पहिल्याच दिवशी हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अगदी पहाटे ४ वाजताच्या शोची तिकीटे मोठ्या प्रमाणात विकली गेली आहेत. तसेच सिनेमा पाहून अनेकजण सोशल मीडियावर निरनिराळ्या पोस्ट करत सिनेमाबद्दलचा त्यांचा अनुभव शेअर करत आहे.
प्रेक्षकांना प्रभासचे पुनरागमन चांगलेच आवडले आहे. तर काहींनी या सिनेमाला आधुनिक रामायण म्हणत प्रभास आणि क्रिती सेनॉनच्या अभिनयाचे कौतुकही करीत आहेत. तर या सिनेमाला ट्रोल करणाऱ्यांसाठी देखील काहींनी पोस्ट केल्या आहेत आणि म्हणाले की त्यांना जज करण्यापेक्षा त्यांच्या उत्तम कलाकृतीचे कौतुक करा. यावरून सध्यातरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे.
तसेच सर्व प्रेक्षक प्रभास, क्रिती, सैफ अली खान, सनी सिंग आणि देवदत्त नागे या कलाकारांनी साकारलेल्या भूमिकेचे कौतुक करीत आहेत.