दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता राम चरण व त्यांची पत्नी उपासना यांच्या घरात २० जून रोजी मुलगी जन्माला आली उपसनाला १९ जून रोजी संध्याकाळी हैदराबाद मधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. राम चरण सतत त्याच्या पत्नीच्या आरोग्याविषयी माहिती सोशल मिडीयावर अपडेट करत असे त्यांनी १४ जून रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील साजरा केला होता व नंतर ५ दिवसातच उपासनाने मध्यरात्री एका लहान गोंडस परीला जन्म दिला. या जोडप्याने तब्बल लग्नाच्या ११ वर्षानंतर एका मुलीला जन्म दिला आहे.
राम चरण व उपासना हे दोघे ११ वर्षानंतर आई-वडील झाल्याने ते खूपच खुश आहेत. तसेच त्यांचे चाहते देखील त्यांच्यावर प्रचंड खुश आहेत. ते उपासना व राम यांच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत होते.
View this post on Instagram
चार दिवसानंतर उपासनाला व तिच्या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रूग्णालया बाहेर त्यांचे चाहते त्यांची अगदी आतुरतेने वाट पाहत होते. जेव्हा उपासना व राम चरण आपल्या लेकीसह रूग्णालयाबाहेर स्पॉट झाले तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे फोटो काढले व गुलाबाच्या पाकळ्यांनी त्याचे स्वागत केले.
रुग्णालयातून बाहेर पडताना राम व उपासनाने आपल्या मुलीला मिठीत घेतले होते. त्या दोघांचा आपल्या लेकी सोबतचा पहिला फोटो देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये रामने त्यांच्या मुलीचा चेहरा अगदी व्यवस्थितपणे झाकला आहे. जेणे करून फोटोमध्ये येणार नाही. चिरंजीवीच्या घरी जाताना अभिनेत्याची आई सुरेखाही या जोडप्यासोबत होती.