अंग्रेजी मिडीयम, पिकु, तलवार, मदारी यांसारख्या अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळविलेला अभिनेता म्हणजे इरफान खान. २०२० ला या दिग्गज अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. परंतू त्यांच्या आठवणी, सिनेमे आणि त्यांचा अभिनय आजही आपल्या लक्ष्यात आहे. इरफान खानचा शेवटचा सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
इरफान यांच्या अभिनयाचा प्रवास अजिबात सोप्पा नव्हता. पण तरी देखील प्रत्येक संकटांवर मात करत त्यांनी संपूर्ण सिनेसृष्टीत स्वतःची एक खास ओळख निर्माण केली. २०२० साली प्रदर्शित झालेला ‘अंग्रेजी मीडियम‘ हा त्यांचा शेवटचा सिनेमा. या सिनेमाच्या नंतर अवघ्या महिन्याभरात त्यांचे निधन झाले.
View this post on Instagram
पण आता इरफान खानचा शेवटचा सिनेमा म्हणजे ‘द साँग ऑफ स्कॉर्पियन्स’. द साँग ऑफ स्कॉर्पियन्स हा सिनेमा सुरुवातीला स्विस, फ्रेंच, सिंगापूर या भाषेत बनवण्यात आला होता. पण आता हा सिनेमा लवकरच हिंदीमध्येही प्रदर्शित होणार असल्याची माहिती इरफान खान यांचा मुलगा, ‘बाबील खान’ याने दिली. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
इरफान खान यांचा ‘द साँग ऑफ स्कॉर्पियन्स’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर या सिनेमामुळे इरफान खान यांना पुन्हा एकदा रुपेरी पड्यावर पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळाली आहे.
द साँग ऑफ स्कॉर्पियन्स हा सिनेमा इरफान खान यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच २८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.