सध्या मराठी सिनेसृष्टीत बरेच कलाकार त्यांच्या चाहत्यांना काही ना काही आनंदाच्या बातम्या देत आहेत. कोणी लग्न करतायत, काही जण नवीन व्यवसाय सुरु करतायत, तर काही जण नवीन घर घेतायत. मराठी कलाकारांपैकी बऱ्याच कलाकारांनी नवीन घर घेतल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. काही दिवसांपूर्वीच ऋतुजा बागवे, प्रसाद ओक, गिरीजा प्रभू, हृता दुर्गुळे, प्राजक्ता माळी, अक्षय केळकर या कलाकरांनी नवीन घर घेत चाहत्यांसोबत आपला आनंद शेअर केला होता. आता यात आणखी एका कलाकाराची भर पडली आहे, त्यांनी देखील नवीन घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
धर्मवीर फेम ‘मंगेश देसाई(Mangesh Desai)’यांनी नवीन घर घेतलं आहे. त्यांनी त्यांच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मिडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. मंगेशने यांनी त्यांच्या नव्या घराची नेमप्लेट दाखवत चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या या नेमप्लेटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेमप्लेटवर ‘मंगेश शलाका साहिल देसाई’ हे नाव पाहायला मिळत आहे. यावेळी व्हिडीओमध्ये मंगेश त्याच्या पत्नी व मुलासह दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शन देत म्हटलं आहे की, “आज मी खूप खुश आहे, तुम्हीसुद्धा माझ्यासाठी खुश असाल ना”. गणेशजयंतीचे औचित्य साधत मंगेशने त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. या व्हिडिओमध्ये देसाई कुटुंबीय पारंपरिक अंदाजात दिसत आहेत.
View this post on Instagram
त्यांच्या या पोस्ट वर संपूर्ण मराठी सिनेसृष्टीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांनी देखील त्यांना शुभेच्छा देत त्याचं कौतुक केल आहे.
२०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केली होती. तसेच प्रवीण तरडे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलं होत. ‘आनंद दिघे’ यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा चांगलाच गाजला होता. मंगेश देसाई यांनी या सिनेमात एक छोटी भूमिका देखील साकारली होती. तसेच या सिनेमाचा दुसरा भाग देखील आता प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच चित्रीकरण देखील सुरु झाल आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या निर्मितीची धुरा देखील मंगेश देसाई यांच्याकडे आहे.