बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे ‘रणबीर कपूर’ (Ranbir Kapoor). काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला रणबीरचा ‘अॅनिमल’ (Animal) हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीत चांगलाच लोकप्रिय झाला. एवढेच नाही तर या सिनेमाने जगभरात देखील कौतुकास्पद कामगिरी केली.
संदीप वंगा दिग्दर्शित अॅनिमल हा सिनेमा जसा गाजला, तसाच तो तेवढाच चांगला चर्चेत देखील राहिला. आजही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा सिनेमा तितकाच चर्चेत आहे. हा सिनेमा काहीवेळा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला आहे. तसेच या सिनेमातील काही इंटीमेट सीनमुळे हा सिनेमा अनेकदा वादाचे कारण बनला असला तरी शेवटी प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेच. यासह सिनेमाची कथा आणि अॅक्शन सीन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे होते. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर अॅनिमलने चांगलाच गल्ला जमवला.
हे देखील वाचा: अॅनिमल सिनेमातील ‘वाॅर मशीन गन’ची नक्की भानगड काय आहे? जाणून घ्या…
अॅनिमलमध्ये रणबीर कपूरसह, अनिल कपूर, बॉबी देओल असे दिग्गज अभिनेते तर रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी अशी स्टार कास्ट आहे. पण या सिनेमामुळे एकही डायलॉग नसतानाही प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले ते बॉबी देओलने. तसेच दुसरीकडे सर्वाधिक चर्चेत राहिली ती रणबीर आणि तृप्तीची सिनेमातील केमिस्ट्री. अॅनिमल सिनेमातील तृप्तीच्या भूमिकेमुळे ती नॅशनल क्रश देखील बनली. सिनेमात रणबीर आणि तृप्ती यांच्यातील इंटीमेट सीन दाखवला आहे. हा सीन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर काहींनी त्यांच्या अभिनयाला दाद दिली. इंटीमेट सीनसह काही सेकंदचा न्युड सीन देखील आहे. तर हा मुद्दा देखील वादाच्या भोवऱ्यात होता.
असे सीन शूट करताना रणबीरला आलियाचा विसर पडला का? तसेच आलियाने रणबीरला यासाठी परवानगी दिली का? असे अनेक प्रश्न रणबीरला विचारण्यात आले होते. परंतू त्यावर आता रणबीरने मौन सोडले आहे. आणि याबाबत खरी माहिती त्याने त्यांच्या चाहत्यांना दिली. तेव्हा तो म्हणाला की, “आम्ही दोघंही एकमेकांच्या कामाबद्दल चर्चा करत असतो. एक कलाकार म्हणून मी आलियाचा खूप आदर करतो. ती कशाप्रकारे विचार करते, एखाद्या सीनमध्ये तिचं डोकं कसं चालतं हे मला तिच्याबद्दल फार आवडतं. या सिनेमातही मी रोज जितके सीन करत होतो मी नेहमीच त्याबद्दल तिच्याशी चर्चा करायचो. तिने मला अनेक सीन्स करण्यापूर्वी मदत केली आहे. खरंतर एक अभिनेता म्हणून मी जे सीन्स करायला घाबरत होतो, जेव्हा मला वाटलं नाही हे फारच चुकीचं वाटतंय, मी कधीही मर्यादा सोडलेली नाही, मी नेहमी स्क्रीनवर गुड बॉय दिसलो तेव्हा मला आलियाने मदत केली.”
तसेच रणबीर पुढे म्हणाला की, “अॅनिमलमधील सीनसाठी आणि खासकरुन मला तयार करण्यासाठी आलियाने माझी मदत केली. आलीया मला म्हणाली की, “ही एक भूमिका आहे. इंटीमेट सीन याचाच भाग आहे.” अॅनिमल सिनेमामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री तृप्ती म्हणाली की, “मला हा सीन शूट करताना रणबीर कपूरची मोठी मदत झाली. सीन शूट करताना त्याने माझी काळजी घेतली.”
यामुळे आज पुन्हा एकदा रणबीर, तृप्ती आणि अॅनिमल हा सिनेमा पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आला आहे.
हे देखील वाचा: प्रेक्षकांसाठी बॉबी देओल हाच ‘अॅनिमल’चा खरा स्टार